जादूटोणा करणे, नरबळी देणे, हे असे प्रकार अजूनही 21 व्या शतकात ऐकायला मिळतातच. दोन दिवसापूर्वी 8 मार्चला महिला दिन साजरा केला व त्यानंतर महिलेच्याच बाबतीत एक भीषण प्रकार घडला. दोन दिवसापूर्वी घडलेल्या प्रकाराला अंधश्रद्धा म्हणण्यापेक्षा विकृतीच म्हणावे. पुण्यातील ग्रामीण भागात घडलेल्या एका प्रकाराने खरंच अंगावर शहारे येतात. Selling menstrual blood, perversity beyond superstition..
पुण्यातील एका महिलेच्या सासरच्याने जादूटोणा करण्यासाठी तिचे हात पाय बांधून आपल्या सुनेचे मासिक पाळीतील रक्त विकण्याचा भयंकर प्रकार केला आहे. निव्वळ आणि निव्वळ अंधश्रद्धेवर आधारित असलेले या सगळ्या गोष्टी याही काळात घडत आहेत. हि किती लांच्छनास्पद गोष्ट आहे. हे कळण्याइतपत देखील डोके या लोकांमध्ये नसतेच. पण माणुसकी देखील ते विकून बसतात. मासिक पाळी सुरू असताना महिलेचा छळ करून हीनकृत्य केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पतीसह सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पती सागर ढवळे,सासू अनिता ढवळे, सासरे बाबासाहेब ढवळे, दीर दीपक ढवळे, मावस दिर विशाल तुपे, रोहन मिसाळ, महादू कणसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाला. यावर त्यांना शिक्षा देखील होईल. पण मूळ मुद्दा वेगळाच आहे. आत्ताच्या या विज्ञान युगात आपण पुढारलेले देश आहोत. असे स्वतःला समजतो. पण हे असे प्रकार ऐकल्यावर खरंच आपण लिबरल आणि मॅच्युअर झालो आहोत का? असा प्रश्न कायम राहतो. मुळात श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्ही गोष्टींना एक लिमिट असते. ती लिमिट पार केल्यानंतर त्याला विकृती असेच नाव दिले जाते. व तेच दिले पाहिजे.
जादूटोणा करणे हे indirectly कर्मकांडाशी जोडले जाते. पण कर्मकांड आणि हा फसवा जादूटोणा याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. कर्मकांड करणारे लोक म्हणजेच अघोरी हे सुद्धा शिवभक्तच आहेत. पण हे कर्मकांडातून हि विकृतकृत्य करत नाहीत. पण कर्मकांड म्हणजेच जादूटोणा असे म्हणत,आपणच त्याला दुजोरा देत असतो. महाराष्ट्रात घडलेली ही केस फक्त एकच नाही. तर रोज अशा कैक केस राज्यात देखील घडत असतात. आणि त्या सगळ्या मोस्टली स्त्रियांच्याच बाबतीत असतात.
“शास्त्राची जेव्हा कानगोष्टींसारखीअवस्था होते, तेव्हा तिला रूढी असे म्हटले जाते”. सुरुवात ही एका व्यक्ती कडून दुसऱ्या व्यक्तीच्या कानात ‘कमळ’ शब्द हा सांगून होते. पण शेवटच्याला समजेस्तोपर्येंत त्याचा ‘चाफा’ झालेला असतो.
स्त्रीला निसर्गानेच सृजनत्वाचा अधिकार दिला आहे. आणि त्यासाठी ती दर महिन्यात निसर्गाला पिरेडच्या रूपाने पे करत असते. या काळात तिची काळजी न घेता. तिचा रिस्पेक्ट न ठेवता. तिचा दुस्वास केला जातो. मासिक धर्मातील स्त्रीसाठी पूर्वीच्या काळात काही नियम घालून दिले होते. ज्या नियमात स्त्रीने मासिक धर्मात बाहेर यासाठी पडू नये कारण तिला विश्रांती मिळावी. तिला होणारा रक्तस्त्रावामुळे ती जर अग्नी जवळ राहिली. तर उष्णता वाढून रक्तस्त्राव अधिक वाढेल. यासाठी तिला स्वयंपाक घरात येऊ नकोस आणि त्याहीपेक्षा तू आराम कर असे असं सांगितले जायचे. पण आता मात्र स्त्री जेव्हा तिच्या मासिक धर्मात असते. तेव्हा तिचे हात,पाय धरून तिचे मासिक पाळीचे रक्त जादूटवण्यासाठी वापरले जाते. अत्यंत शहारे आणणारा भयंकर असा हा प्रकार आहे.
आपण कितीही स्वतःला पुढारलेले समजले तरी, तसे नाही. आपल्या समाजाचा काही भाग अजूनही हीन प्रवृत्तीचाच आहे. हेच यातून दिसते. मांजराने रस्ता ओलांडला म्हणून काम अडू नये यासाठी माणूस पाच पावले मागे जातो या गोष्टीला अंधश्रद्धा म्हणणे ठीक आहे. पण जादूटोण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करून त्या व्यक्तीचा अपमान करत त्या व्यक्तीची जगण्याची इच्छाशक्तीच मारून टाकणं. याला अंधश्रद्धा नाही तर विकृती असेच म्हटले पाहिजे. आपण ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या महाराष्ट्रात राहणारी लोकं आहोत. आपल्याला हे वागणे कितपत शोभा देते? हा समाज म्हणून आपण विचार केला पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App