विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेल्या चोवीस तासांत देशात एकूण २० लाख ६३ हजार ८३९ चाचण्या घेण्यात आल्या आणि आतापर्यंत भारताने एकूण ३४ कोटी चाचण्या पूर्ण केल्या आहेत. देशभरात एकीकडे चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशभरात दिल्या जाणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसींच्या एकूण संख्येने २१ कोटीचा टप्पा ओलांडला आहे. Second wave decreased in country
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने माजवलेल्या हाहाकाराला आता उतरती कळा लागली आहे. रुग्णसंख्या घटत असून, अडीच लाखांपर्यंत गेलेली दैनंदिन नवीन रुग्णांची संख्या घटून १ लाख ६५ हजारांवर आली आहे. कोरोना संसर्गाचा दरही आठ टक्क्यांवर राहून सलग सहाव्या दिवशी तो दहा टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे. गेल्या चोवीस तासांत एकूण रुग्णसंख्येत एक लाख १४ हजारांनी घट नोंदविली गेली असून आता देशातील एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी सक्रिय रुग्णसंख्येचे प्रमाण ७.५८ टक्के आहे.
दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत सतत घट झालेली आढळत असून, सलग तिसऱ्या दिवशी दोन लाखांहून कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सलग सतराव्या दिवशी कोविडमुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही उपचाराधीन रुग्णांच्या तुलनेत वाढलेली असून गेल्या २४ तासांत २लाख ७६ हजार ३०९ रूग्ण कोविडमुक्त झाल्याची नोंद झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App