सैनिक मुलाच्या मृतदेहाचा शोध घेत आठ महिन्यांपासून बाप फिरतोय वणवण, दिसेल तेथे जमीन खोदून शोधतोय

काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे कुटुंबांवर काय परिस्थिती ओढविली आहे याची करुण कहाणी समोर आली आहे. प्रादेशिक सेनेत असलेल्या आपल्या तरुण सैनिक मुलाचा मृतदेह शोधण्यासाठी एक बाप आठ महिन्यांपासून वणवण फिरत आहे. दिसेल तेथे जमीन खोदून शोधत आहे.Searching for soldier son’s body for eight months


विशेष प्रतिनिधी 

श्रीनगर : काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे कुटुंबांवर काय परिस्थिती ओढविली आहे याची करुण कहाणी समोर आली आहे. प्रादेशिक सेनेत असलेल्या आपल्या तरुण मुलाचा मृतदेह शोधण्यासाठी एक बाप आठ महिन्यांपासून वणवण फिरत आहे. दिसेल तेथे जमीन खोदून शोधत आहे.

हातात एक फावडे आणि कुदळ. सतत फिरत राहण्यासाठी त्यांनी घर सोडले आहे. मंझूर अहमद वागेय असे या अभागी बापाचे नाव आहे. त्यांच्या २५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी दोन ऑगस्ट रोजी प्रादेशिक सेनेत असलेला मंझूर यांचा मुलगा शाकीर मंझूर हा बालपोरा आणि बाहीबाग भागात आला होता.



घर जवळ असल्याने ईदच्या दिवशी तो घरी जेवण करण्यासाठी गेला. कुटुंबाबरोबर जेवण घेऊन तो बाहेर पडला. त्यानंतर अर्ध्या तासाने शाकीरला शेवटचे पाहिले गेले. त्याने फोन करून कुटुंबियांना आपण मित्रांबरोबर बाहेर चाललो असल्याचे सांगितले. वरिष्ठांनी फोन करून माझ्याबाबत विचारले तर काळजी करू नका, असेही म्हणाला. त्यानंतर त्याचा पत्ता लागलेला नाही.

वागेय म्हणाले, कदाचित त्याचे त्याच वेळी अपहरण झाले असावे. पण घरच्यांशी एकदा बोलण्यासाठी त्याने फोन केला असावा. कारण त्यानंतर दुसर्या दिवशी शाकीरची मोटार त्याच्या घरापासून १६ किलोमीटर अंतरावर सापडली.

सात दिवसांनी त्याचे रक्ताने माखलेले कपडे सापडले. त्याच्या मोटारीत शर्टाचा एक तुकडाही सापडला. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार अपहरण होताना झालेल्या झटापटीत शर्ट फाटला असावा.

त्यांनतर आठवडाभराने सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप आली. यामध्ये दहशतवाद्यांनी म्हटले होते की आम्ही सैनिकाची हत्या केल्यावर त्याचा मृतदेह कुटुंबाकडे सोपविणार नाही. कारण भारतीय लष्करही दहशतवाद्याला मारल्यावर त्याचा मृतदेह परत देत नाही.

पोलीसांकडून अद्यापही शाकीर याचा शोध घेतला जात असला तरी त्याच्या वडीलांनी आता त्याचा मृत्यू स्वीकारला आहे. ते म्हणतात शाकीरचे अपहरण झाल्यावर एका महिलेने त्याला पाहिले होते. यावेळी चार जण त्याला टॉर्चर करत होते.

त्याचे रक्ताने माखलेले कपडे पाहिल्यावर जीवंत असण्याची शक्यता कमीच आहे. पण आता त्यांची एकच मागणी आहे. आपल्या मुलाचा मृतदेह शोधायचा आणि त्याचे विधीवत अंतिम संस्कार करायचे. त्यासाठी ते सातत्याने प्रवास करत आहेत. घर सोडले आहे. हातात कुदळ फावडे घेऊन जमीन खोदत आहेत. कोठेतरी मुलाचा मृतदेह पुरलेला असेल अशी वेडी आशा त्यांच्या मनात आहेत.

Searching for soldier son’s body for eight months

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात