वृत्तसंस्था
नवी दिल्ली : टेरर फंडिंग संदर्भात कट्टरतावादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI वर देशभरात शंभरहून अधिक ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्था एनआयएची छापेमारी सुरू असताना दुसरी कट्टरतावादी संघटना सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया SDPI रस्त्यावर उतरली आहे. हीच ती सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आहे तिचा बंगलोर हिंसाचारात हात असून या संघटनेच्या म्होरक्यांनी बंगलोर मध्ये आमदारांची घरे जाळण्यापर्यंत मजल मारली होती. SDPI on the streets against raids on PFI in connection with terror funding
एनआयए तपास संस्थेने देशभरात टेरर फंडिंग विरोधात तब्बल 13 राज्यांमध्ये पहाटेपासूनच जोरदार छापेमारी सुरू केली आहे. टेरर फंडिंग मध्ये सामील असलेल्या शंभरहून अधिक भोरक्यांना एनआयए, ईडी आणि अन्य केंद्रीय तपास संस्थांच्या अधिकाऱ्यांनी अटक देखील केली आहे. बिहार, झारखंड, महाराष्ट्र, केरळ, तेलंगण, तामिळनाडू आदी 13 राज्यांमध्ये एकाच वेळेला ही धडक कारवाई सुरू आहे.
या धडक कारवाईने हादरलेल्या आणि आपले टेरर मोड्यूल उध्वस्त होण्याच्या भीतीने पीएफआय संघटनेचे म्होरके वेगवेगळ्या संघटनांच्या नावाखाली वेगवेगळ्या राज्यांमध्ये रस्त्यावर उतरले आहेत. “एनआयए गो बॅक”, “शरम करो डूब मरो” सारख्या हिंसक घोषणा ते देत आहेत.
Kerala Police detained PFI workers in Kannur after they tried to block a road in order to protest against the NIA raids NIA raids are underway at several locations linked to PFI in several states pic.twitter.com/53zRJ7TYo4 — ANI (@ANI) September 22, 2022
Kerala Police detained PFI workers in Kannur after they tried to block a road in order to protest against the NIA raids
NIA raids are underway at several locations linked to PFI in several states pic.twitter.com/53zRJ7TYo4
— ANI (@ANI) September 22, 2022
कारवाई पूर्णपणे कायदेशीर
एनआयए करत असलेली कारवाई कायदेशीर असून गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीच्या आधारे टेरर फंडिंग विरुद्ध ही कारवाई सुरू आहे. निवडक अरब देशांमधून भारतात पीएफआयशी संबंधित 3 लाख कुटुंबांच्या कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये सुमारे 5000 कोटी रुपये आल्याची गुप्तचर सूत्रांची माहिती आहे. याविषयी घातपाती साखळी उघड करण्यासाठी एनआयएची छापेमारी सुरू आहे.
13 राज्यांमध्ये एकाच वेळी ही कायदेशीर कारवाई सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृह सचिव, केंद्रीय राखीव दलाचे सचिव महासंचालक तसेच एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली आहे. सध्या सुरू असलेल्या टेरर फंडिंग विरोधातील कायदेशीर कारवाई बद्दल यामध्ये चर्चा होऊन पुढील कोर्स ऑफ ॲक्शन या बैठकीत ठरविण्यात आल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App