R Chidambaram : शास्त्रज्ञ आर चिदंबरम यांचे निधन; पोखरण अणुचाचण्यांमध्ये बजावली होती महत्त्वाची भूमिका!

R Chidambaram

पद्मश्री आणि पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : R Chidambaram  पोखरण अणुचाचणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे देशाचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे शनिवारी निधन झाले. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चिदंबरम यांनी शनिवारी मध्यरात्री 3.20 वाजता मुंबईतील जसलोक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.R Chidambaram

चिदंबरम यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 रोजी चेन्नई येथे झाला. भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमातील महत्त्वाच्या भूमिकेसाठी ते ओळखले जातात. पोखरण-1 (1975) आणि पोखरण-2 (1998) अणुचाचण्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. चिदंबरम यांना 1975 आणि 1999 मध्ये पद्मश्री आणि पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते.



पोखरण अणुचाचण्यांचे मुख्य वास्तुकार 1974 मध्ये प्लुटोनियम घेऊन जाणाऱ्या लष्करी ट्रकमधून मुंबईहून पोखरणला गेले. ‘इंडिया राइजिंग मेमोयर ऑफ अ सायंटिस्ट’मध्ये त्यांनी खुलासा केला की हा कार्यक्रम 1974 ते 1998 दरम्यान गुप्त ठेवण्यात आला होता.

चिदंबरम यांनी भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) चे संचालक, अणुऊर्जा आयोगाचे (AEC) अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे (DAE) सचिव म्हणून काम केले आहे. याशिवाय ते इंटरनॅशनल ॲटोमिक एनर्जी एजन्सी (IAEA) च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्षही होते.

Scientist R Chidambaram passes away played an important role in Pokhran nuclear tests

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात