विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना काळात अनेकांचे रोजगार बंद झाले आहेत. त्यामुळे नागरिक मुलांच्या शाळेची फी भरु शकत नाहीत. फी वाढ करु नका, अशी मागणी करणाऱ्या डोंबिवलीमधील एका पालकाला शाळेने मोठा झटका दिला आहे. त्याच्या मुलाचा दाखल पोस्टाने घरी पाठवून दिला.School certificate by post directly at home; Dombivli school shock system
संबंधित व्यक्ती हा पालकांचं नेतृत्व करत असल्याने शाळेने त्या पालकाच्या मुलाला शाळेतून काढल्याचा दाखला थेट पोस्टाने घरी पाठविला आहे. विद्यार्थ्याने या घटनेचा धसका घेतला आहे. या संदर्भात लालचंद पाटील या पालकाने शिक्षणमंत्र्यांकडे शाळेची परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे.
डोंबिवलीच्या ग्रामीण भागात असलेल्या सोनारपाडा परिसरात शंकरा नावाची शाळा आहे. या शाळेत काही दिवसांपूर्वी फी वाढविण्यात आली होती. कोरोना काळात अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.काही पालकांचा व्यवसाय बंद झाला आहे. वाढीव फी देणार कशी? असा प्रश्न पालकांसमोर आहे.
हीच बाब लक्षात घेऊन लालचंद पाटलांनी सर्व पालकांच्या वतीने पुढाकार घेतला. फी कमी करण्यात यावी या संदर्भात शाळा प्रशासनास निवेदन दिले. इतकेच नाही तर वारंवार फी कमी करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे शाळा प्रशासनाने याचा राग काढला, असा आरोप लालचंद पाटील यांनी केला.विशेष म्हणजे पाटील यांच्या मुलाला शाळेतून काढून टाकत दाखला थेट घरी पोस्टाने पाठविला. त्या मुळे मुलाला देखील धक्काच बसला आहे.
याप्रकरणी लालचंद पाटील यांनी शाळेची परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे.लालचंद पाटील यांनी शाळेच्या विरोधात शालेय शिक्षणमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे.तर या बाबत शाळा प्रशासनाने कॅमरामसोर बोलण्यास नकार दिलाय .तर या बाबत कल्याण तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी यांनी चौकशी करून या प्रकरणी कारवाई करणार असल्याचे मत स्पष्ट केले आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App