विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्टेट बँकेच्या खातेदारांना आता एका महिन्यांत केवळ चार वेळेसच मोफत पैसे काढण्याची सुविधा दिली जाणार आहे. त्यापेक्षा अधिक वेळा व्यवहारावर शुल्क आकारणी केली जाणार आहे. नवीन नियम एक जुलैपासून लागू होणार आहेत. SBI will charge for withdraw money
एसबीआयकडून आता अतिरिक्त मूल्यवर्धित सेवेसाठी पंधरा ते ७५ रुपयांपर्यंत शुल्क आकारणी केली जाणार आहे. बॅकेची शाखा, एसबीआय एटीएम किंवा अन्य बँकेचे एटीएममधून एका महिन्यात केवळ चार वेळेसच नि:शुल्क पैसे काढता येथील. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी पंधरा रुपये आणि जीएसटी आकारला जाईल.
एटीएम आणि शाखेतून एकूण चारपेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास शुल्क वसूल केले जाईल.चेकबुक सेवेसाठी एका वर्षासाठी पहिले दहा चेक हे मोफत दिले जातील. त्यानंतरच्या दहा चेकसाठी ४० रुपये, २५ चेकसाठी ७५ रुपयांचे शुल्क वसूल केले जाईल. तसेच अतिरिक्त जीएसटी आकारणी होईल. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकच्या जादा शुल्कातून सवलत देण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App