वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आत्तापर्यंत बँकेवर दरोडा, एटीएमवर दरोडा कोट्यवधींच्या नोटा चोरल्या, अशा बातम्या येत होत्या. पण राजस्थान मधून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून पैसे चोरीला गेले आहेत पण नाण्याच्या रूपात… ते देखील तब्बल 11 कोटी…!!SBI: Rs 11 crore missing from bank vault in Rajasthan; CBI inquiry started
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तिजोरीतूनच कोट्यवधी रुपये गायब झाले होते. या बँकेच्या तिजोरीतून तब्बल 11 कोटी रुपयांची चिल्लर गायब झाली होती. या प्रकरणाची चौकशी आता सीबीआय करणार आहे. राजस्थानमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मेहंदीपूर बालाजी शाखेतील ही घटना आहे.
या प्रकरणी एफआयआर दाखल
या घटनेनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी राजस्थान हायकोर्टात धाव घेतली आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. हायकोर्टाने हा तपास सीबीआय सोपवला असून सीबीआयने स्वतः या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. परंतु या प्रकरणाची व्याप्ती बघता बँकेने सीबीआयकडे हे प्रकरण देण्याची मागणी केली होती.
… अन् बँकेचे अधिकारी हादरले
एसबीआयने या नाण्यांची मोजणी सुरू केली तेव्हा एसबीआय शाखेतून नाण्यांच्या चोरीचे प्रकरण उघडकीस आले. यादरम्यान बँकेतील रोख रकमेची हेराफेरी झाल्याचे निदर्शनास आले. जयपूरमधील एका खासगी कंत्राटदाराला 13 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची नाणी मोजण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या मोजणीमध्ये शाखेतून 11 कोटी रुपयांची नाणीच गायब असल्याचे समोर आले. सुमारे 2 कोटी रुपये असलेल्या केवळ 3,000 नाण्यांच्या पिशव्यांचा हिशेब लागला. कारण ही नाणी रिझर्व बँकेकडे जमा करण्यात आली होती.
एक रूपया आणि दोन रूपयाची नाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गायब होण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. एसबीआयच्या शाखेत जमा रकमेमध्ये अफरातफर झाल्याचा संशय आल्याने या नाण्यांची मोजणी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हळू हळू हा आकडा एक, दोन कोटींवरून थेट 11 कोटींवर गेल्याने मोजणी करण्यासाठी आलेले बँकेचे अधिकारी देखील हादरले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App