वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Sansad Ratna Awards लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना उत्कृष्ट संसदीय कामकाजासाठी दिला जाणारा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्राइम फाउंडेशनच्या वतीने हे पुरस्कार दिले जातात. यामध्ये देशातील सतरा खासदार आणि दोन संसदीय स्थायी समिती यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील सात खासदारांनी आपल्या कार्याची चूकुन दाखवत हे पुरस्कार पटकावले आहे.Sansad Ratna Awards
या सात खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, शिवसेनेचे श्रीरंग अप्पा बारणे, भाजपच्या स्मिता वाघ, अरविंद सावंत, नरेश म्हस्के, वर्षा गायकवाड, आणि भाजपच्या मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे.Sansad Ratna Awards
संसदेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 17 खासदार आणि 2 संसदीय स्थायी समित्यांना 2025 च्या संसदरत्न पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. हे पुरस्कार संसदेतील सक्रियता, वादविवादात सहभाग, प्रश्न विचारणे आणि कायदेविषयक कामात योगदान या आधारावर दिले जातात. हा पुरस्कार प्राइम पॉइंट फाउंडेशनने सुरू केला आहे. या वर्षीच्या विजेत्यांची निवड राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीने केली. ते म्हणाले की, लोकशाही बळकट करण्यासाठी संसदेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या खासदारांना हे पुरस्कार दिले जातात.
सातत्याने उत्कृष्ट काम करणाऱ्या चार खासदारांना विशेष सन्मान
संसदीय लोकशाहीत उल्लेखनीय आणि शाश्वत योगदान दिल्याबद्दल चार खासदारांना विशेष सन्मानित केले जाईल. प्राइम पॉइंट फाउंडेशनच्या मते, हे चार खासदार 16 व्या आणि 17 व्या लोकसभेत संसदेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांमध्ये देखील आहेत आणि त्यांच्या चालू कार्यकाळात सतत सक्रिय आहेत.
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरद पवार) श्रीरंग अप्पा बारणे (शिवसेना) भर्तृहरी महताब (भाजप) एन.के. प्रेमचंद्रन (रासप) संसदरत्न पुरस्कार विजेते इतर खासदार
उर्वरित 13 खासदारांचीही त्यांच्या उत्कृष्ट संसदीय कार्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी समाविष्ट आहेत. या खासदारांनी संसदेत प्रश्न विचारण्यात, चर्चेत भाग घेण्यात आणि विधेयकांवर सूचना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
स्मिता वाघ (भाजप) अरविंद सावंत (शिवसेना उद्धव ठाकरे गट) नरेश गणपत म्हस्के (शिवसेना) वर्षा गायकवाड (काँग्रेस) मेधा कुलकर्णी (भाजप) प्रवीण पटेल (भाजप) रवी किशन (भाजप) निशिकांत दुबे (भाजप) विद्युत बरन महतो (भाजप) पी. पी. चौधरी (भाजप) मदन राठोड (भाजप) सी. एन. अन्नादुराई (द्रमुक) दिलीप सैकिया (भाजप) दोन संसदीय समित्यांनाही सन्मान मिळाला
या वर्षी दोन संसदीय स्थायी समित्यांनाही संसदरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाईल. यामध्ये
वित्तविषयक स्थायी समिती – अध्यक्ष : भर्तृहरी महताब
या समितीने संसदेत आर्थिक धोरणांवरील अनेक प्रभावी आणि व्यावहारिक अहवाल सादर केले आहेत.
कृषीविषयक स्थायी समिती – अध्यक्ष: चरणजीत सिंह चन्नी (काँग्रेस)
या समितीने संसदेत शेतकऱ्यांच्या समस्या आणि कृषी सुधारणांवर ठोस सूचना मांडल्या आहेत.
संसदरत्न पुरस्कार म्हणजे काय?
संसदरत्न पुरस्कार 2010 मध्ये सुरू करण्यात आला आणि पारदर्शकता, जबाबदारी आणि लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी संसदेत सक्रिय राहणाऱ्या खासदारांना हे पुरस्कार दिले जातात. खासदारांना प्रोत्साहन देणे आणि लोकांमध्ये संसदीय कामकाज लोकप्रिय करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App