पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊतच मास्टर माईंड; ईडीचे 4000 पानी आरोपपत्र


प्रतिनिधी

मुंबई : 1034 कोटी रुपयांच्या गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे ४ ऑक्टोबरपर्यंत त्यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे. संजय राऊतांच्या विरोधात आता ईडीने 4000 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. Sanjay Raut is the mastermind in the mail scam

या आरोप पत्रात संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आले आहे. पत्राचाळ घोटाळ्यातले मास्टर माईंड ठरविले आहे. संजय राऊतांवर झालेल्या सुनावणीत त्यांची कोठडी ४ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ईडीने राऊतांच्या विरोधात ४ हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये राऊतांना दोषी ठरवण्यात आले आहे. पत्राचाळ प्रकल्पातून राऊतांनी पैसे कमावले, अशा प्रकारचा आरोप या आरोपपत्रात नमूद करण्यात आला आहे.

वाधवान बंधूशी संगनमत करून संजय राऊतांनी पत्राचाळ प्रकरणातून पैसे कमावले असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. तसेच पत्राचाळ प्रकरणातील प्रमुख आरोपी संजय राऊतच असल्याचेही म्हटले आहे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत हा घोटाळा झाला असून राऊतांच्या परदेश दौऱ्याचे पैसे याच कंपनीतून आल्याचा उल्लेख या आरोप पत्रात करण्यात आले आहे.

Sanjay Raut is the mastermind in the mail scam

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात