प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पत्राचाळ घोटाळा प्रकरणात स्वतःला भोगाव्या लागलेल्या 102 दिवसांच्या कारावासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकमान्य टिळक + स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आणीबाणीत संघर्ष केलेल्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या तुरुंगवासाशी केली आहे. Sanjay Raut compares Patra’s jail term to that of Savarkar + Tilak + Vajpayee
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटायला जाण्यापूर्वी पत्रकारांना दिलेल्या बाईट मध्ये त्यांनी तुरुंगवास खूप अवघड असतो असे सांगितले आणि आपल्या तुरुंगवासाची तुलना त्यांनी लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तुरुंगवासाशी केली. संजय राऊत म्हणाले तुरुंगवास किती अवघड असतो, हे केवळ आपण वाचून समजू शकतो.
परंतु मला तुरुंगवास झाला. तुरुंगात राहावे लागले. मी सावरकरांच्या एकलकोंडीसारखा एकांतवासात राहिलो. सावरकर अंदमानात 10 वर्षे कसे राहिले असतील, लोकमान्य टिळक मंडलेमध्ये 6 वर्षे कसे राहिले असतील, अटल बिहारी वाजपेयी हे देखील आणीबाणीच्या काळात 2.5 वर्षे तुरुंगात होते त्यांनी कसे दिवस काढले असतील, याची जाणीव मला झाली. राजकारणातल्या व्यक्तींना तुरुंगवासात जावेच लागते.
एक प्रकारे संजय राऊत यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या नेत्यांच्या तुरुंगवासाची तुलना स्वतःला मनी लॉन्ड्रींग प्रकरणात भोगावे लागलेल्या 102 दिवसांच्या तुरुंगवासाशी केली. या मुद्द्यावरून सोशल मीडियात अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App