आगामी तीन वर्षांचा असणार संजय मल्होत्रा यांचा कार्यकाळ
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Sanjay Malhotra रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) नवे गव्हर्नर महसूल सचिव संजय मल्होत्रा असणार आहेत. ते शक्तीकांत दास यांची जागा घेणार आहे. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने संजय मल्होत्रा यांची 12 डिसेंबर 2024 पासून सुरू होणाऱ्या 3 वर्षांच्या कालावधीसाठी RBI चे पुढील गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे.Sanjay Malhotra
संजय मल्होत्रा यांनी आयआयटी-कानपूरमधून शिक्षण घेतले आहे. त्यांनी अमेरिकेतील प्रिन्सटन विद्यापीठातून पब्लिक पॉलिसी विषयात पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे.
RBI गव्हर्नर होण्यापूर्वी , संजय मल्होत्रा महसूल सचिव म्हणून काम करत होते आणि ते राजस्थान केडरचे 1990 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते REC चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक देखील राहिले आहेत. अलीकडे त्यांनी अधिक कर संकलन होण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App