विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Waqf सुधारणा नाकारून उत्तर प्रदेशातील संभलचा खासदार जिया उर रहमान बर्कने थेट भारतावरच मालकी हक्क सांगितला. मुसलमान या देशाचे नोकर नाहीत, मालक आहेत, अशी दर्पोक्ती बर्कने केली. बर्कच्या या वक्तव्यामुळे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण झाली. या देशातल्या साधन संपत्तीवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क आहे, असे मनमोहन सिंग राष्ट्रीय विकास परिषदेत म्हणाले होते. त्यावरून मोठ्या गदारोळ उठला होता.
आता waqf सुधारणा विधेयकावरच्या चर्चेत लोकसभेमध्ये बोलताना अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीच्या संभलच्या खासदाराने म्हणजेच जिया उर रहमान बर्कने देशावरच मालकी हक्क सांगितला. फाळणीच्या वेळी ज्या मुसलमानांना पाकिस्तानात जायचे होते, ते त्या देशात निघून गेले.
उरलेले मुसलमान भारतात राहिले. ते देशभक्त आहेत. मुसलमान या देशाचे नोकर नाहीत, तर या देशाचे मालक आहेत. तुम्ही Waqf board चे अधिकार हिरावून घेऊन मुसलमानांचे हक्क संपवू शकत नाही, अशी दमबाजी जिया उर रहमान बर्कने केली.
खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी महात्मा गांधी असल्याचा आव आणत waqf सुधारणा विधेयकाची प्रत लोकसभेत फाडली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App