चित्रकूटच्या गाढव बाजारात सलमान – शाहरुखला टॉपचा भाव; बाकीच्या बॉलिवुड एक्टर्सना टाकले मागे!!

प्रतिनिधी

चित्रकूट : “चित्रकूट के घाट पर भई संतन की भीर, तुलसीदास चंदन घिसे तिलक करे रघुवीर!!”, असे हे संत तुलसीदास आणि श्रीरामाचे चित्रकूट. Salman – Shahrukh get top price in donkey market of Chitrakoot

पण याच चित्रकूट परिसरात दिवाळीच्या दिवसात मोठा बाजार भरतो. धनत्रयोदशीपासून सुरू झालेला हा बाजार भाऊबीजेपर्यंत चालतो. यातला एक बाजार म्हणजे गाढवांचा बाजार. चित्रकूट हे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांच्या सीमेवर बसल्यामुळे दोन्ही राज्यातले अनेक लोक या बाजारात येतात आणि गाढवांच्या बाजारात कोट्यावधींची उलाढाल होते. बाजारातले गाढव विक्रेते आपल्या गाढवांना जास्तीत जास्त किंमत मिळावी म्हणून त्यांना बॉलिवूड ॲक्टर्सची नावे देतात. सध्या चित्रकूटच्या गाढव बाजारात सलमान खान शाहरुख खानला टॉपचा भाव आला आहे. सलमान एक लाखाच्या वरच्या भावाला विकला गेला आहे तर शाहरुखलाही तेवढाच भाव मिळाला आहे.

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी चित्रकूटला दरवर्षी मंदाकिनी नदीच्या किनारी गाढवांची जत्रा भरते. यावेळी तब्बल 5000 गाढवे विक्रीसाठी आणली जातात. विशेष म्हणजे त्यांची किंमत लाखोंच्या घरात असते. चित्रकूट हे मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवर असल्याने दोन्ही राज्यातील व्यापारी, विक्रेते आणि खरीददार या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात, अशी माहिती यात्रेचे आयोजक मुन्नालाल त्रिपाठी यांनी सांगितलं.

या यात्रेत आणल्या जाणाऱ्या गाढवांना फिल्मी कलाकारांची नावे देण्यात आली आहेत. सलमान, शाहरुख, रणबीर, ऋतिक आणि राजकुमार अशी या गाढवांची नावे आहेत. या गाढवांची बोली लावून ते विकले जातात. जो जेवढी मोठी बोली लावेल, त्याचे सलमान आणि शाहरुख होतात. यंदा या बाजारात सलमानची किंमत सर्वाधिक आहे. त्याची किंमत 1 लाख ते दीड लाखापर्यंत असल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले.

कुणाची किंमत किती?

सलमान : 1 लाख रुपये
शाहरुख : 90 हजार से 1 लाख रुपये
ऋतिक : 70 हजार रुपये
रणबीर : 40 हजार रुपये
राजकुमार : 30 हजार रुपये

हा गाढव बाजार भाऊबीजेपर्यंत चालत असल्याने इथली उलाढाल देखील कोट्यावधींची असते.

Salman – Shahrukh get top price in donkey market of Chitrakoot

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात