त्रिपुरामध्ये साहा दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार : पीएम मोदी आणि अमित शहादेखील राहणार उपस्थित

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा आज म्हणजेच बुधवारी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेदेखील उपस्थित राहणार आहेत. राज्यातील 60 विधानसभा जागांसाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. 2 मार्च रोजी निकाल आले, यात भाजपने बहुमत मिळवले.Saha to take oath as Chief Minister for second time in Tripura PM Modi and Amit Shah will also be present

निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांनी 6 मार्च रोजी निर्णय घेतला की भाजप नेते माणिक साहा पुन्हा मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारतील.



भाजप-आयपीएफटी युतीला 11 जागांचे नुकसान

त्रिपुरामध्ये भाजप आणि आयपीएफटीने युती करून निवडणूक लढवली. त्यांना 2018च्या निवडणुकीच्या तुलनेत 11 जागांचे नुकसान झाले. त्यानंतरही या आघाडीने 33 जागा जिंकून बहुमत मिळवले. राज्यात भाजपला 32, तर आयपीएफटीला फक्त 1 जागा मिळाली. दुसरीकडे, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सीपीआय(एम) आणि काँग्रेस आघाडीने राज्यात 14 जागा जिंकल्या आणि 2 जागांचे नुकसान झाले. तर, टीपीएमने राज्यात 13 जागा जिंकल्या.

2023 च्या निवडणुकीत भाजपने सर्व 60, डाव्या-काँग्रेस आघाडीने (अनुक्रमे 47 आणि 13 जागा) निवडणूक लढवली. टिपरा मोथा पक्षाने 42 जागांवर निवडणूक लढवली होती. 2018च्या निवडणुकीत भाजपला 35, सीपीआयएमला 16 आणि आयपीएफटीला 7 जागा मिळाल्या होत्या. भाजपने सरकार स्थापन केले.

त्रिपुरामध्ये 86.10% मतदान, गत निवडणुकीपेक्षा 4% कमी

16 फेब्रुवारी रोजी त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत 60 जागांवर 86.10% मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण 4 टक्के कमी आहे. 2018 मध्ये, त्रिपुरामध्ये 59 जागांवर 90% मतदान झाले होते. 35 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यासह भाजपने डाव्यांचा 25 वर्षांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला होता. गेल्या निवडणुकीत विजयानंतर पक्षाने बिप्लब देव यांना मुख्यमंत्री बनवले, पण मे 2022 मध्ये माणिक साहा यांना मुख्यमंत्री करण्यात आले. साहा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ही निवडणूक लढवली होती.

Saha to take oath as Chief Minister for second time in Tripura PM Modi and Amit Shah will also be present

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात