विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसद घुसखोरी प्रकरणातून रोज वेगवेगळे धक्कादायक खुलासे तपास पोलीस तपासून बाहेर येत आहेत. मोदी सरकारच्या बदनामीचे सर्व आरोपींचे मनसुबे तर होतेच, पण त्या पलीकडे जाऊन देशात संपूर्ण अराजक माजवण्याचे कारस्थान या 6 आरोपींनी आणि त्यांच्या म्होरक्यांनी रचले होते, असे आता उघड झाले आहे. Sagar Sharma was going to set himself on fire outside Parliament by hanging a fire-proof gel on his body
आरोपी केवळ संसदेत घुसून केवळ स्मोक हल्ला करणार होते असे नाही, तर सागर शर्मा हा संसदेबाहेर स्वतःला पेटवून देखील घेणार होता. मात्र केवळ ऑनलाइन पेमेंट फसल्याने त्याचे हे कारस्थान बारगळले. त्यातही सागर शर्माचा चालूगिरीचा एक डाव होता, तो म्हणजे शरीराला अग्नि प्रतिबंधक जेल फासून तो संसदेबाहेर पेटवून घेणार होता. यामुळे त्याचे कपडे तर जळले असते, परंतु त्याचे शरीर बचावले असते. पण यामुळे एका युवकाने भारतीय संसदेबाहेर स्वतःला पेटवून घेतले, असा आंतरराष्ट्रीय पातळीवर कांगावा करण्याचा सर्व आरोपींचा डाव होता.
काय होते कारस्थान??
सूत्रांच्या माहितीनुसार, सागर संसदेच्या बाहेर स्वतःला पेटवून घेणार होता. जेल क्रीम खरेदीसाठी त्याने ऑनलाईन ऑर्डर दिली. पण पेमेंटमध्ये अडथळा आल्याने ऐनवेळी त्याने हे कारस्थान रद्द केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण त्याच्या या खुलाशाने यंत्रणेला पण झटका बसला कारण खरंच तसे झाले असते, तर संसद परिसरात मोठा गोंधळ उडाला असता.
सैन्यात भरतीचे स्वप्न भंगले
आरोपी सागर शर्मा हा इयत्ता 12वी उत्तीर्ण आहे. सैन्यात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने कसून प्रयत्न केले. अनेकदा प्रयत्न करुनही त्याला सैन्यात भरती होता आले नाही. त्याचे स्वप्न भंगले. त्यानंतर तो काही दिवस बेंगळुरुमध्ये राहिला. काही महिन्यापूर्वीच तो लखनऊमध्ये परतला आणि येथे ई-रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. आता त्याचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही.
डायरीत क्रांतिकारकांची बदनामीच
सागर शर्मा याच्या लखनऊमधील घरात पोलिसांना एक डायरी मिळाली. यामध्ये घराचा निरोप घेण्याची वेळ आल्याचे त्याने सांगितले. सागरच्या कुटुंबियांनी त्याची ही डायरी स्थानिक पोलिसांना दिली. आता ही डायरी दिल्ली पोलिसांच्या हाती सोपविण्यात आली आहे. या डायरीत सागरने 2015 ते 2021 या काळात त्याच्या मनातील अनेक गोष्टी उतरवल्या आहेत. यामध्ये क्रांतिकारकांच्या विचारांसह काही कविता आणि विचार लिहिले आहेत. पण त्याच्या कृतीतून मात्र प्रत्यक्षात क्रांतिकारकांची बदनामी झाली.
पेमेंट फेल झाल्याने योजना टळली
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सागरची चौकशी केली. त्यात त्याने संसदेबाहेर स्वतःला जाळून घेण्याच्या योजनेचा खुलासा केला. त्याने त्यासाठी एक जेल सारखी वस्तू ऑनलाईन खरेदी केल्याचे सांगितले. हे जेल शरीराला लावल्यावर त्वचा सुरक्षित राहते. कपडे जळतात, असा त्याचा दावा होता. पण ऑनलाईन पेमेंट फेल झाल्याने त्याने हे कारस्थान सोडून दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App