काँग्रेसने सचिन पायलट यांना याद्वारे एक सूचक इशारा दिला असल्याचं बोललं जात आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसने आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांध, प्रदेश प्रमुख डीके शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, जगदीश शेट्टर, शशी थरूर आणि इतर ज्येष्ठ नेत्यांची नावे आहेत. मात्र राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे नाव या यादीत वगळले आहे. Sachin Pilots name has no place in the list of star campaigners of Congress in Karnataka
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भूपेश बघेल, सुखविंदर सिंग सुखू यांच्यासह माजी क्रिकेटपटू आणि माजी खासदार मोहम्मद अझरुद्दीन, इम्रान प्रतापगढ़ी आणि कन्हैया कुमार यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. एवढच नाही तर अनेक दिवसांपासून पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर असलेल्या राज बब्बर आणि दिव्या सपंदना यांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
स्टार प्रचारकांच्या यादीत सचिन पायलटच्या नावाची अनुपस्थिती लक्षणीय आहे. कारण ते काँग्रेसमध्ये अतिशय लोकप्रिय नेते आहेत. देशभरातील गेल्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये गांधी घराण्यानंतर सचिन पायलट यांना काँग्रेसच्या उमेदवारांनी सर्वाधिक पसंती दिली आहे.
गेल्या आठवड्यात पक्षाने नकार देऊनही गेहलोत सरकारविरोधात उपोषण करणाऱ्या सचिन पायलट यांना कर्नाटक स्टार प्रचारकांच्या यादीतून डावलून पक्षाने कडक संदेश दिल्याचे मानले जात आहे. नुकतेच पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात वाक् युद्ध रंगले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी या दोघांना काँग्रेसचा वारसा संबोधले होते.
कर्नाटकात १० मे रोजी मतदान –
कर्नाटकातील सर्व २२४ विधानसभा जागांसाठी १० मे रोजी मतदान होणार असून, मतमोजणी १३ मे रोजी होणार आहे. काँग्रेसने कालच सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली होती. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने २५ मार्च रोजी १२४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. पक्षाने आतापर्यंत एकूण २१६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आता आणखी आठ जागांसाठी उमेदवार घोषित करणे बाकी आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App