सचिन आणि सारा यांना दोन मुले असून,दोन्ही मुले पायलट यांच्याकडेच आहेत.
विशेष प्रतिनिधी
जयपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे पत्नी सारा पायलट पासून विभक्त झाले आहेत. पायलट यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आज ही माहिती दिली आहे. Sachin Pilot divorced his wife Sara wrote divorced in the affidavit instead of his wifes name
या दोघांमध्ये घटस्फोट कधी झाला हे अद्याप समोर आले नसले, तरी दोघे वेगळे झाल्याचे पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या समोर आले आहे. आपल्या प्रतिज्ञापत्रात पायलटने पत्नीच्या नावासमोर घटस्फोटित लिहिलं आहे. सचिन आणि सारा यांना दोन मुले आहेत. दोन्ही मुले सचिन पायलट यांच्याकडेच आहेत. याचा खुलासाही प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन पायलट आणि सारा यांचे सुमारे १९ वर्षांपूर्वी १५ जानेवारी २००४ रोजी लग्न झाले होते. सारा ही जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला यांची मुलगी आहे. असे म्हटले जाते की अब्दुल्ला या लग्नाच्या विरोधात होते, तर पायलटचे कुटुंबही या नात्यावर नाराज होते. या नात्यासाठी घरच्यांना तयार करण्यात सचिन यशस्वी ठरले पण सारा तसं करू शकली नव्हती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App