वृत्तसंस्था
ढाका : Jaishankar भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ढाका येथे पाकिस्तानी संसदेचे अध्यक्ष अयाज सादिक यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलनही केले. दोघेही बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.Jaishankar
भारत-पाकिस्तान दरम्यान मे महिन्यात झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर, दोन्ही देशांच्या कोणत्याही मोठ्या नेत्यांनी समोरासमोर भेटून हस्तांदोलन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याच कारणामुळे ही भेट राजनैतिक दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.Jaishankar
यापूर्वी, आशिया कप क्रिकेट सामन्यादरम्यान टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता, यावरून बराच वाद निर्माण झाला होता. इतकंच नाही तर मालिका जिंकल्यानंतरही टीम इंडियाने एसीसी प्रमुख मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. मोहसिन नकवी हे पीसीबीचे प्रमुख आणि पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री आहेत.
खालिदा झिया यांच्या अंत्ययात्रेत 10 लाख लोक सहभागी
यापूर्वी खालिदा झिया यांना आज संध्याकाळी 5 वाजता दफन करण्यात आले. झिया यांना संसद परिसरातील झिया उद्यानात त्यांचे पती आणि बांगलादेशचे माजी राष्ट्रपती झियाउर रहमान यांच्या कबरीजवळ दफन करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी देशभरातून 10 लाख लोक जमले होते.
खालिदा झिया यांचे मंगळवारी सकाळी 80 वर्षांच्या वयात निधन झाले. त्या गेल्या सुमारे 20 दिवसांपासून रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होत्या. त्यांच्या निधनावर बांगलादेश सरकारने तीन दिवसांच्या राष्ट्रीय शोकाची घोषणा केली आहे. या काळात संपूर्ण देशात सरकारी इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकावला जाईल आणि सर्व सरकारी कार्यक्रम स्थगित राहतील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App