रशियाच्या बॉम्बहल्ल्यांनी युक्रेन हादरले, 122 क्षेपणास्त्रे, 36 ड्रोनने हल्ला; 24 जणांचा मृत्यू

युक्रेनच्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हा युद्धातील सर्वात मोठा हवाई हल्ला होता


विशेष प्रतिनिधी

कीव : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाने पुन्हा एकदा भयानत वळण घेतले आहे. दरम्यान, शुक्रवारी रशियाने युक्रेनवर 122 क्षेपणास्त्रे आणि अनेक ड्रोनने हल्ला केला. रशियन हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. युक्रेनच्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हा युद्धातील सर्वात मोठा हवाई हल्ला होता.Russias bombings on Ukraine 122 missiles 36 drone strikes 24 people died



युक्रेनच्या हवाई दलाने रशियाचे बहुतेक हल्ले हवेतच पाडले, असे युक्रेनचे लष्कर प्रमुख व्हॅलेरी झालुझनी यांनी सांगितले. युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले की, आम्ही 158 पैकी 87 रशियन क्रूझ क्षेपणास्त्रे आणि 27 ड्रोन पाडले आहेत.

रशियन हल्ल्यात 24 लोक ठार झाले आणि 130 हून अधिक जखमी झाले. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की लाखो युक्रेनियन नागरिक क्षेपणास्त्र स्फोटांच्या मोठ्या आवाजाने जागे झाले. परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी सांगितले की, राजधानी कीवमध्ये तीन जण ठार झाले आहेत.

Russias bombings on Ukraine 122 missiles 36 drone strikes 24 people died

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात