प्रतिनिधी
नवी दिल्ली : रशिया – युक्रेन युद्धाच्या बातम्यांनी जगभरातला मीडिया भरलेला असताना भारतीय लिबरल्सनी मात्र या बद्दल वेगळी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारतीय मीडियाला चीन आणि लडाखच्या बातम्यांमध्ये नव्हे, तर रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाच्या बातम्यांमध्ये जास्त रस आहे,असे टीकास्त्र भारतीय लिबरल्सनी सोडले आहे.Russia – Ukraine war: Indian media is more interested in news of Russia-Ukraine war, not China-Ladakh !!; Tikastra of the Liberals
या संदर्भात प्रख्यात पत्रकार सुशांत सिंग यांनी ट्विट केले आहे, तर त्यांचे हे ट्विट महात्मा गांधींचे चरित्रकार आणि प्रख्यात विचारवंत रामचंद्र गुहा यांनी रिट्विट केले आहे. लडाख मध्ये चीनच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. भारत आणि चीन त्यांच्या लष्करी स्तरावरच्या चर्चेच्या 20 पेक्षा जास्त फेऱ्या झाल्यात.
पण लडाख मधल्या तणावावर अद्याप समाधानकारक तोडगा काढण्यात आलेला नाही. या विषयी भारतीय मीडिया आता काहीच बोलत नाही. पण रशिया आणि युक्रेन युद्धाच्या बातम्या मात्र आवर्जून देतो, असे ट्विट सुशांत सिंग यांनी केले आहे. सुशांत सिंग यांच्या मताला रामचंद्र गुहा यांनी दुजोरा देण्यासाठीच त्यांचे ट्विट गुहांनी रिट्विट केले आहे.
Amazing yet true. Indian television news channels and newspapers know more about Russian deployment and military presence in Ukraine than about Chinese military presence in Ladakh. — Sushant Singh (@SushantSin) February 24, 2022
Amazing yet true. Indian television news channels and newspapers know more about Russian deployment and military presence in Ukraine than about Chinese military presence in Ladakh.
— Sushant Singh (@SushantSin) February 24, 2022
माजी भारतीय डिप्लोमॅट के. सी. सिंग यांनी रशिया – युक्रेन युद्धाबद्दल ट्विट केले आहे. त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे 2004 मधले एक वक्तव्य ट्विट केले आहे. अमेरिकेने अफगाणिस्तान वरचा केलेल्या हल्ल्याचा निषेध करताना पुतिन यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचा हवाला देत ज्या हल्ल्याला संयुक्त राष्ट्र संघाची मान्यता नाही, ती अधिकृत लष्करी कारवाई मानता येणार नाही, असे म्हटले होते. त्याची आठवण के. सी. सिंग यांनी करून दिली आहे.
त्याच बरोबर रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य देखील त्यांनी रिट्विट केले आहे. युक्रेन लष्कराने शस्त्रे खाली ठेवली तर त्यांच्याशी वाटाघाटी करायला रशिया तयार आहे, असे वक्तव्य रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी केल्याचे या बातमीत म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App