Russia Ukraine ceasefire : रशियाचा युक्रेनमध्ये अखेर युद्धविराम, पण….फक्त “ह्युमन कॉरिडॉरसाठी”!!

वृत्तसंस्था

मॉस्को : रशियाकडून युक्रेनमध्ये सध्या तात्पुरती युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी सुरक्षित काॅरिडोर देण्यासाठी हा निर्णय रशियाकडून घेण्यात आल्याचे समोर येत आहे. युक्रेनमध्ये जे नागरिक अडकले आहेत, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी या युद्धविरामाची घोषणा करण्यात आल्याचे रशियाकडून सांगण्यात आले आहे. Russia Ukraine ceasefire: Russia finally has a ceasefire in Ukraine, but only for “human corridor” !!

रशियाकडून तात्पुरती युद्धबंदी

रशियाने युद्धबंदीचा निर्णय हा तात्पुरत्या धोरणावर केला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात झालेल्या बैठकीत रशियाकडून हे सांगण्यात आले. ज्या शहरांवर जोरदार हल्ले केले गेले, त्या शहरांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढता यावे,तसेच हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना योग्य उपचार आणि सुरक्षित स्थळी नेता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रशियाने सांगितले आहे.



…म्हणून युद्धबंदीची घोषणा

युक्रेनकडून ही मागणी रशियाला करण्यात आली होती. युक्रेनच्या या मागणीनंतर रशियाकडून ही सकारात्मक युद्धबंदी करण्यात आली आहे. पश्चिमी प्रसारमाध्यमं रशियावर युक्रेनमध्ये अडकलेल्या निष्पाप नागरिकांना नाहक युद्धबळी देत असल्याची टीका करण्यात येत होती. रशियाचा मुख्य उद्देश हा युक्रेनचे मुख्य एअर बेस आणि मिलीट्री इन्स्टालेशन उध्वस्त करण्याचं होतं. पण या युद्धामध्ये मात्र 200 पेक्षा अधिक सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामुळे आता रशियाने तात्पुरत्या युद्धविरामाचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ह्युमन कोरिडोर बनवणार

युद्धविरामानुसार युक्रेनच्या वोल्नोवाखाच्या डीपीआर शहरात ह्युमन कॉरिडोर बनवण्यात येणार आहे. त्यानुसार युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जाणार आहे. या ठिकाणी युक्रेनची सैना तैनात असेल.

Russia Ukraine ceasefire: Russia finally has a ceasefire in Ukraine, but only for “human corridor” !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात