मैत्रीची खूण : रशियाने पीओके + अक्साई चीन नकाशात दाखवले भारतात

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारत आणि रशिया या दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अनेकदा समोर आले आहेत. काळाच्या कसोटीवर देखील उतरलेले दिसले आहेत. संयुक्त राष्ट्र संघासह अनेक म आंतरराष्ट्रीय मंचांवर अनेकदा भारताच्या बाजूने उभे राहून रशियाने आपले मित्रत्व सिद्ध केले आहे. आताही एक नकाशा जारी करत रशियाने पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांना चांगलाच दणका दिला आहे. Russia shows PoK + Aksai China in map in India

चीन आणि पाकिस्तानला धक्का

स्पुटनिक या रशियन न्यूज एजन्सीने एक नकाशा जारी करत या नकाशात भारत आणि चीनदरम्यान वादग्रस्त असलेला अक्साई चीनसह अरुणाचल प्रदेश आणि पाकव्याप्त काश्मीर(POK) हे भारताचे अविभाज्य भाग असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे भारतविरोधी कारवाई करणा-या पाकिस्तान आणि चीन या दोन्ही शेजारी देशांना चांगलाच धक्का बसला आहे.


Russia Ukraine War : ‘टायटॅनिक’ अभिनेता लिओनार्डोची युक्रेनला मदत ; या देशाशी आहे खास नातं…


भारताची बाजू भक्कम

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या सदस्य राष्ट्रांचा हा नकाशा रशियन सरकारकडून जारी करण्यात आला आहे. या नकाशात भारताच्या भूभागांवर चीन आणि पाकिस्तानकडून होणा-या अतिक्रमणाला धक्का बसला असून जागतिक पातळीवर भारताचे स्थान अधिक बळकट झाले आहे. असे असतानाच दुसरीकडे मात्र चीनने SCO साठी जारी केलेल्या आपल्या नकाशात मात्र भारतातील भागांवर आपला हक्क सांगितला आहे. पण रशियाच्या या नकाशामुळे चीनला देखील मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Russia shows PoK + Aksai China in map in India

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात