युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला दावा अन् व्हिडिओही दर्शवला
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Russia जवळपास तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी रशियाच्या हल्ल्याबाबत मोठा दावा केला. झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून दावा केला आहे की रशियाने त्यांच्या चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला आहे आणि त्यांनी या हल्ल्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे देखील प्रसिद्ध केली आहेत.Russia
रशियाकडून चेर्नोबिल पॉवर प्लांटवर ड्रोनने हल्ला केलागेल्याचा दावा झेलेन्स्की यांनी केला. या ड्रोनमध्ये घातक स्फोटक वारहेड बसवण्यात आले होते. झेलेन्स्की यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘चेर्नोबिल पॉवर प्लांटचे चौथे पॉवर युनिट हल्ल्यात नष्ट झाले आहे. रशियाने पॉवर प्लांटच्या रेडिएशन शेल्टरवर हल्ला केला आहे.
झेलेन्स्की यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ‘हा पॉवर प्लांट युक्रेनने युरोप आणि जगातील इतर देशांच्या मदतीने उभारला होता.’ त्यांनी या हल्ल्याबद्दल रशियावरही जोरदार टीका केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App