लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजतानाच संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा 15, 16, 17 मार्चला नागपुरात!!


विशेष प्रतिनिधी

नागपूर : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यावर्षी 15, 16 आणि 17 मार्च 2024 रोजी विदर्भातील नागपूर (महाराष्ट्र) येथील ‘स्मृतिभवन’ परिसर, रेशिमबाग येथे होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीतीच्या पातळीवर या बैठकीला माध्यमांच्या दृष्टीने महत्त्व असले तरी प्रत्यक्षात संघाच्या एकूण नियोजनाच्या दृष्टीने ही नियमित महत्त्वाची बैठक असणार आहे.RSS representatives meeting on 15, 16, 17 March in nagpurलोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष तारखांची घोषणा निवडणूक आयोग येत्या 10 ते 15 दिवसांतच करणार आहे. त्यामुळे संघाच्या प्रतिनिधी सभेच्या बैठकीचे आयोजन लोकसभा निवडणुकीची जोडले जाणे स्वाभाविक आहे, पण संघाची कार्यपद्धती लक्षात घेतली, तर लोकसभा निवडणुकी सारख्या अत्यंत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी विषयी घाईगर्दीने नियोजन करणे आणि अंमलबजावणी करणे ही बाब संघाच्या कार्यपद्धतीत बसत नाही. संघाच्या कार्यपद्धतीनुसार लोकसभा निवडणुकीचे नियोजन ही दीर्घकालीन आणि नियमित चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रतिनिधी सभेच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीविषयी विशिष्ट चर्चा होणार असली, तरी बैठकीचा संपूर्ण भर फक्त त्याच विषयावर असेल असे मानण्याचे कारण नाही.

नागपुरात होणाऱ्या संघ प्रतिनिधी सभेच्या या बैठकीत 2023-24 च्या संघाच्या कार्याचा आढावा आणि आगामी वर्षाच्या (2024-25) संघाच्या कार्य आराखड्यावर चर्चा होणार आहे .यासोबतच सरसंघचालकांसह अन्य सर्व अखिल भारतीय कार्यकर्त्यांचा प्रवास , स्वयंसेवक प्रशिक्षणासाठी संघ शिक्षा वर्गांच्या नव्या योजनेच्या अंमलबजावणीचा विचार होईल.

2025 हे संघ संस्थापनेच्या शताब्दीचे वर्ष आहे. संघाच्या शताब्दीनिमित्त कार्य विस्तार योजनेच्या बळकटीकरणासोबतच विशेषतः आगामी शताब्दी वर्षाच्या उपक्रमांवर चर्चा होणार आहे. प्रतिनिधी सभेत देशाच्या सद्यस्थितीचा विचार करून महत्त्वाच्या विषयांवरही प्रस्तावही पारित केले जातील.

संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा दरवर्षी देशाच्या विविध भागात आयोजित केली जाते. दर तिसऱ्या वर्षी तिचे आयोजन नागपुरात केले जाते. प्रतिनिधी सभेत 45 प्रांतातील 1500 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. प्रतिनिधी सभेच्या बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले, सर्व सह सरकार्यवाह , अखिल भारतीय कार्यकारिणी, क्षेत्र आणि प्रांत कार्यकारिणी, संघाचे निवडून आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी, सर्व विभाग प्रचारक तसेच विविध संघटनांचे निमंत्रित कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, असे संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी कळविले आहे.

RSS representatives meeting on 15, 16, 17 March in nagpur

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात