ब्रिजभूषण सिंह यांना कोर्टाकडून मोठा दिलासा, २५ हजारांच्या जातमुचलक्यावर मिळाला जामीन!

महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर सिंग यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कुस्तीपटूंच्या गंभीर आरोपांचा सामना करत असलेले खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने ब्रिजभूषण यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने ब्रिजभूषण यांना २५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर सिंग यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. Rouse Avenue Court of Delhi grants regular bail to outgoing Wrestling Federation of Indias President Brij Bhushan Sharan Singh

भारतीय कुस्ती महासंघाचे निवर्तमान अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत. ब्रिजभूषण यांच्यावर काही महिला कुस्तीपटूंनी हे आरोप केले होते. अनेक कुस्तीपटूंच्या तक्रारींच्या आधारे नोंदवलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने गुरुवारी ब्रिजभूषण आणि विनोद तोमर सिंग यांना नियमित जामीन मंजूर केला.

न्यायालयाने नमूद केले की दिल्ली पोलिसांच्या वकिलाने असे सादर केले आहे की, ते जामीन अर्जाला विरोध किंवा समर्थन करत नाही, त्यांचे एवढेच म्हणणे आहे की कायद्याच्या तरतुदींनुसार यावर कारवाई केली जाईल. मात्र, युक्तिवादादरम्यान कुस्तीपटूंच्या वकिलांनी विरोध दर्शवला.

वकील हर्ष वोहरा तक्रारकर्त्यांतर्फे हजर झाले आणि त्यांनी असा दावा केला की ब्रिजभूषण शरण सिंह यांचा राजकीय प्रभाव असल्याने आणि तक्रारदार ज्या संघटनेचे भाग आहेत त्या संघटनेचे ते प्रमुख असल्याने त्यांना जामीन देऊ नये. “जामीन मंजूर झाल्यास, तो कठोर अटींसह केला पाहिजे आणि त्यांनी तक्रारकर्त्यांकडे जाऊ नये,” असे वकील म्हणाले.

Rouse Avenue Court of Delhi grants regular bail to outgoing Wrestling Federation of Indias President Brij Bhushan Sharan Singh

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात