मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यात जेरुसलेम येथील टेंपल माउंटवरील प्रार्थनेस विरोध केल्याचा कांगावा करत आणि पूर्व जेरूसलेमच्या शेख जर्रा येथील काही पॅलेस्टाईन कुटुंबांना त्यांच्या घरातून बेदखल करण्यात आल्याचे सांगत पॅलेस्टाईनच्या दहशतवादी संघटनांनी इस्रायलवर रॉकेट्सचा भडिमार केला आहे. इस्रायलनेही प्रतिकार सुरू केल्याने गाझा पट्टी आणि इस्रायल युद्धाच्या छायेत आहे. 2008 पासून पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यात तीन वेळा मोठ्या चकमकी झाल्या आहेत. यात सन 2014 मधील चकमक सर्वाधिक म्हणजे 54 दिवस चालली. याला इस्रायलने ‘ऑपरेशन प्रोटेक्टीव एज’ असे म्हटले होते. Rocket attacks by the Muslim terrorist organization Hamas; Israel’s bitter resistance; flared up War again in the Gulf
वृत्तसंस्था
जेरुसलेम : बुधवारी पहाटे हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी मुस्लिम संघटनेने इस्रायलच्या दक्षिण व मध्य भागात रॉकेट हल्ले केले. यामुळे लागलेल्या आगीत प्रचंड वित्तहानी झाली असून मनुष्यहानीचा अंदाज घेतला जात आहे. रॉकेट हल्ल्यांपासून वाचण्यासाठी हजारो लोकांनी तेल अवीव येथून बेरशेबा येथील बॉम्ब-आश्रयस्थळाकडे धाव घेतली आहे.
इस्रायल संरक्षण दलाने गाझामधील एक इमारत उध्वस्त केल्याने आणि हमासच्या दोन ज्येष्ठ दहशतवाद्यांना ठार केल्याची प्रतिक्रिया म्हणून हमासने इस्रायलच्या नागरी वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रॉकेट हल्ले सुरू केल्याचे बोलले जाते.
इस्रायली संरक्षण दलाच्या (‘आयडीएफ’च्या) म्हणण्यानुसार, सोमवारी सायंकाळी सुरू झालेल्या या लढाईचत आत्तापर्यंत गाझा पट्टीवरुन 1 हजार 50 पेक्षा जास्त रॉकेट्सचा मारा झाला. तोफांमधूनही दारुगोळा डागण्यात येत आहे. आयडीएफचे प्रवक्ते हिदाई झिलबर्मन यांनी सांगितले की, पॅलेस्टाइनने डागलेली 85 ते 90 टक्के रॉकेट नागरी वस्त्यांमध्ये पडली आहेत. हमासच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना आयडीएफने गाझा पट्टीतल्या 500 पेक्षा जास्त ठिकाणांवर हल्ले चालू केले आहेत.
आयडीएफच्या म्हणण्यानुसार, हमासच्या हल्ल्यानंतर मोठ्या संख्येने इस्रायली नागरिक बॉम्ब शेल्टरमध्ये आसरा घेत आहेत. मात्र वेळेत या केंद्रांवर पोहोचू न शकलेल्या लोकांचे हाल सुरू आहेत.
आयडीएफने गाझा शहरातील एक नऊ मजली इमारत उध्वस्त केली आहे. इस्रायलनेही आत्तापर्यंत 200 हून अधिक रॉकेट पॅलेस्टाईनमध्ये सोडली आहेत. इस्रायली हल्ले अचूक लक्ष्यभेद करणारे असल्याने हमासचेही मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. सैन्याच्या म्हणण्यानुसार या इमारतीत हमासची कार्यालये, त्यांचे गुप्तचर केंद्र, वेस्ट बँक कमांड आणि प्रसार विभाग यांचा समावेश होता. आयडीएफने हे हल्ले करण्यापूर्वी सामान्य नागरिकांना पळ काढण्याचा इशारा दिला होता. या हल्ल्यात हमासच्या दोन वरिष्ठ गुप्तहेर अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येत आहे. इस्रायली गुप्तचर व्यवस्थेने त्यांची ओळख पटवली असून त्यांची नावे हमास काओगी (हमास सैन्य गुप्तचर विभागाचा सुरक्षा विभाग प्रमुख) आणि त्याचा सहाय्यक वाईल असल्याचे सांगितले.
गाझा पट्टीतून 11 मे रोजी झालेल्या रॉकेट हल्ल्यात तेल अवीव जवळच्या शहरांचे मोठे नुकसान झाले आहे. तेल अविव ही इस्रायलची आर्थिक राजधानी आहे. इस्रायलच्या अद्ययावत लोह घुमट क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेने अनेक रॉकेट निकामी केली. मात्र यावेळी नष्ट झालेल्या रॉकेटच्या तुकड्यांनी काही घरे आणि इमारतींचे नुकसान केले. यात अनेक लोक जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. उत्तर तेल अवीवमधील इमारतीलाही जोरदार धडक बसली आहे.
दरम्यान तेल-अविवमधील बेन गुरीयन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व हवाई वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली. तेल अविवकडे येणारी विमाने सायप्रसकडे वळवण्यात आली आहेत. मात्र काही वेळातच दोन तासांपेक्षा कमी अंतरावरील उड्डाणे पुन्हा सुरू केली गेली.
आयडीएफ होम फ्रंट कमांडने पॅलेस्टिनी हल्ल्यांची तीव्रता लक्षात घेऊन मध्य आणि दक्षिण इस्रायलमधील सर्व रहिवाशांना बॉम्ब-आश्रयस्थानात जाण्याची सूचना केली आहे. तसेच शाळा बंद करण्याचे आदेश दिले.
हमासच्या मंगळवारच्या हल्ल्यात एलाट-एशकलॉन तेल पाइपलाइनशी संबंधित असलेल्या अश्कलोनमधील एका मोठ्या टाकीला रॉकेटची धडक बसली. यामुळे लागलेली मोठी आग बर्याच तासांपासून धुमसत आहे. अग्निशामक कर्मचाऱ्यांना बुधवारी सकाळपर्यंत ती विझवता आली नव्हती. त्यांनतर मंगळवारी संध्याकाळी इस्त्रायली विमानांनी जोरदार प्रत्युत्तर देत गाझा शहरावर हल्ले केले. “छप्पर ठोकणारा” स्ट्राइक करण्याआधी इस्रायलने सर्वसामान्य नागरिकांना घरे सोडण्याची सूचना दिली होती.
RAW FOOTAGE: This is the moment the Iron Dome intercepted a barrage of rockets over Tel Aviv and central Israel. pic.twitter.com/8jl8OTgWCl — Israel Defense Forces (@IDF) May 11, 2021
RAW FOOTAGE: This is the moment the Iron Dome intercepted a barrage of rockets over Tel Aviv and central Israel. pic.twitter.com/8jl8OTgWCl
— Israel Defense Forces (@IDF) May 11, 2021
इस्रायली हल्ल्यानंतर काढलेल्या घटनास्थळावरील व्हिडिओंमध्ये हमासच्या अनेक कमांडरांची ऑफिस आणि घरे उद्ध्वस्त झाल्याचे तसेच दाट काळ्या धूरात वाहून गेल्याचे दिसले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App