Robert Vadra : रॉबर्ट वाड्रांची आज पुन्हा चौकशी; बँक खाती, दस्तऐवजांच्या फॉरेन्सिक चौकशीची तयारी

Robert Vadra

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : Robert Vadra हरियाणाच्या शिकोहपूर येथील ३.५ एकर जमीन व्यवहार प्रकरणात काँग्रेस नेते प्रियंका गांधी-वाड्रा यांचे पती व उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांची बुधवारी ईडीकडून पाच तास चौकशी करण्यात आली. ईडीने त्यांना गुरुवारीही बोलावले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही चौकशी २०१९ च्या चौकशीपेक्षा वेगळी आहे. वाड्रा यांच्या स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी कंपनीने डीएलएफला जमीन विक्री करून मिळवलेल्या आर्थिक फायद्याबाबत प्रश्न विचारण्यात आले. २०१९ ची चौकशी लंडन प्रॉपर्टीशी संबंधित होती.Robert Vadra

ईडी स्कायलाइटची खाती, घेवाण-देवाण प्रक्रिया प्रक्रियेचे, दाखल-खारिज आणि भू-उपयोग परिवर्तनाशी संबंधित दस्तऐवजांचे फॉरेन्सिक विश्लेषण करू शकते. या चौकशीचा उद्देश हा आहे की, या व्यवहारातून काळा पैसा पांढरा करण्यात आला का आणि सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग झाला का? ईडीने व्यवहारातील बँक ट्रांजेक्शनची माहिती मागवली आहे. एजन्सीला शंका आहे की, जमीन खरेदी आणि विक्रीदरम्यान अनेक व्यवहार मनी लॉन्ड्रिंगच्या कक्षेत येतात.



या प्रकरणात काहीच तथ्ये नाहीत, हा केवळ सूड- काँग्रेस

काँग्रेसने पार्टी संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर चार्जशीटच्या विरोधात बुधवारी ईडी कार्यालयांसमोर आंदोलन केले. काँग्रेस खासदार अभिषेक सिंघवी म्हणाले, हे प्रकरण सूड आणि त्रास देण्याचे राजकारण आहे. प्रश्न आहे की, मनी ट्रेल कुठे आहे? गुन्हा काय झाला, फायदा कोणाला झाला… पण याचे उत्तर मिळणार नाही. सरकार फक्त देशाला फसवू पाहत आहे.

कोणालाही लूटण्याचा अधिकार नाही- भाजप

भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, काँग्रेसला धरणे देण्याचा अधिकार आहे, पण नॅशनल हेराल्डला सरकारने दिलेल्या संपत्तीचा दुरुपयोग करण्याचा नाही. त्यांनी म्हटले, कोणालाही लूटण्याचा अधिकार नाही. त्यांनी म्हटले, जे वृत्तपत्र इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी सुरू केले, ते काँग्रेस पार्टीसाठी कमाईचे साधन बनले.

केवळ सूड घेण्यासाठी वारंवार तेच प्रश्न- वाड्रा

वाड्रा सकाळी ११ वा. प्रियंका यांच्यासोबत ईडी कार्यालयात पोहोचले. दुपारी भोजनासाठी घरी गेले व पुन्हा परतले. संध्याकाळी ६ वा. बाहेर पडले. प्रियंका संपूर्ण वेळ ईडीच्या व्हिजिटर्स रूममध्ये होत्या. वाड्रा म्हणाले- मी २०१९ मध्ये ईडीला सर्व सांगितले आहे. वारंवार तेच प्रश्न सूड व मानसिक त्रास आहे. काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणाले, हे त्यांचा वैयक्तिक प्रकरण आहे. ते उत्तर देण्यास सक्षम आहेत.

Robert Vadra to be questioned again today; Preparations for forensic examination of bank accounts, documents

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात