काँग्रेसच्या डोक्यावर कट्टा ठेवून राजदने चोरलेय मुख्यमंत्रीपद; पण मोदींनी सांगितलेली बात अंदर की, की बिहार मधले जाहीर भांडण??

Modi

विशेष प्रतिनिधी

पाटणा : Modi मी तुम्हाला आज अंदर की बात सांगतोय असे असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने काँग्रेसच्या डोक्यावर कट्टा ठेवून कसे मुख्यमंत्रीपद चोरले याची कहाणी ही कहाणी तर बिहार मधल्या छोट्या पोराला देखील माहिती झाली होती.RJD has stolen the Chief Minister’s post by putting a stake in the Congress’s head; But is what Modi said internal or is it a public fight in Bihar??

नरेंद्र मोदींनी आज बिहारमध्ये आरा, नवादा आदी शहरांमध्ये प्रचंड जाहीर सभा घेतल्या. या सभांमध्ये त्यांनी लालूप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाला आणि काँग्रेसला चांगलेच ठोकून काढले. दोन्ही पक्षांमधली भांडणे चव्हाट्यावर आणली पण ती आधीच चव्हाट्यावर आली होती.Modi

मी तुम्हाला आज अंदर की बात सांगतोय बिहार मधल्या सगळ्यात भ्रष्ट परिवाराच्या नेत्यांनी देशातल्या सगळ्यात भ्रष्ट परिवाराच्या पक्षाच्या नेत्यांच्या कानफाटावर कट्टा लावून बिहारचे मुख्यमंत्रीपद चोरले, असे नरेंद्र मोदी म्हणाले.Modi



– काँग्रेसला लागले झुकावे

पण यात अंदर की बात कुठलीच नव्हती कारण बिहारच्या मुख्यमंत्री पदावरून काँग्रेस आणि राजद यांच्यात चांगलीच जुंपली होती हे अख्ख्या बिहारने पाहिले. तेजस्वी यादव यांनी राहुल गांधींचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे केले तरी राहुल गांधींनी तेजस्वी यादव यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले नव्हते. त्याउलट राहुल गांधींनी कन्हैया कुमारचे घोडे पुढे दामटायचा डाव केला होता, पण तो डाव तेजस्वी यादव यांनी हाणून पाडला. त्यांनी महागठबंधन मधील जागा वाटपाची चर्चा ताणून धरली त्यामुळे काँग्रेसला लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव या बाप बेट्यांपुढे झुकावे लागले. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना लालूप्रसाद यादव यांच्या घरी जावे लागले. तिथे तेजस्वी यादव यांची मुख्यमंत्री पदाची उमेदवारी मान्य करावी लागली त्यानंतरच महागठबंधनची घोषणा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हीच कहाणी अंदर की बात म्हणून बिहार मधल्या जनतेला पुन्हा ऐकवली. पण बिहारी जनतेसाठी त्यात नवीन काही नव्हते.

RJD has stolen the Chief Minister’s post by putting a stake in the Congress’s head; But is what Modi said internal or is it a public fight in Bihar??

महत्वाच्या बातम्या


	Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात