वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : जग कोरोना विषाणू आणि काळ्या, पांढऱ्या आणि पिवळ्या बुरशीच्या संकटाचा सामना करत आहे. परंतु, कोरोनापेक्षा खतरनाक साथीचा धोका असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने ( डब्लूएचओ) दिला आहे. Risk of a more dangerous epidemic than corona; World Health Organization warning
कोरोनाच्या विषाणूपेक्षाही वेगाने संसर्ग पसरवण्याची क्षमता या नव्या रोगाच्या विषाणूमध्ये आहे, असे डब्लूएचओचे महासंचालक टेड्रोस अदनोम घेब्रेयिसस यांनी सांगितले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य संस्थेची 74 वी वार्षिक सभा पार पडली. त्यावेळी केलेल्या भाषणात टेड्रोस यांनी हा इशारा दिला. या सभेला 194 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोनामुळे धोकादायक बनलेली परिस्थिती अजूनही कायम असल्याचे टेड्रोस यांनी सांगितले.
सर्वात कमजोर लोकांना वाचवणे हा विषाणूवर विजय मिळवण्याचा एकमेव उपाय आहे, असे टेड्रोस म्हणाले. सर्वात कमजोर असलेल्या लोकांना सर्वात आधी मदत पोचवून त्यांना मजबूत केले तर सर्वांचा निश्चितच विजय होईल,असे ते म्हणाले. जगातील गरीब देशांना कोरोनाविरुध्द लढण्यासाठी मदत पुरवण्याची गरज असल्याचे संकेत त्यांनी त्यातून दिले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App