विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वप्न आणि संकल्प…, जे छोटे ठेवायचेच नाहीत. म्हणूनच 1000 वर्षांच्या गुलामीला 1000 वर्षांच्या प्रगतीच्या संकल्पाचे प्रत्युत्तर!!, असे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचे स्वरूप राहिले. पंतप्रधान मोदींनी देशातल्या दोन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प केला, तसेच भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सवलतीच्या घरात कर्ज देण्याची घोषणाही मोदींनी केली. यातून मोदींनी देशातल्या छोट्या घटकांना सरकारच्या सवलतींशी जोडण्याचा प्रयत्न केला.Resolved to make 2 crore women Lakhpati Didis
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालाच्या सुरुवातीला झालेल्या स्वातंत्र्य दिन समारंभात लाल किल्ल्यावरून संबोधित करताना मोदींनी देशवासीयांसमोर स्वप्न आणि संकल्प छोटी ठेवलीच नाहीत. जो घाम गाळायचा, जे काम करायचे ते पुढच्या 1000 वर्षांच्या प्रगतीच्या पायाभरणीचेच असले पाहिजे, असे स्वप्न आणि संकल्प मोदींनी देशवासीयांना दिले.
पीएम मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन अनेक नवीन योजनांची घोषणा केली. अनेक नवीन आश्वासन दिली. वर्ष 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदी यांचे लाल किल्ल्यावरुन हे शेवटच संबोधन होते. या भाषणाचे अनेक राजकीय अर्थ आहेत. 2024 नंतर पुन्हा सत्तेवर येण्याचे नाहीत तर त्या पलीकडचे फार मोठ्या कालखंडाचे आहेत. या कालखंडात जे निर्णय होतील, ते पुढच्या 1000 वर्षाची दिशा निश्चित करतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने पारंपारिक कलाकुसरीच्या सोनार, सुतार, मिस्त्री, कुंभार, चर्मकार आदी व्यवसायिक लोकांसाठी विश्वकर्मा योजना सुरू करण्याची घोषणा केली. विश्वकर्मा योजनेत 15 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
देशात आतापर्यंत 10 हजार जन औषधी केंद्र होती. आता हे लक्ष्य 25 हजार औषधी केंद्राच केलं आहे. म्हणजे अजून 15 हजार जन औषधी केंद्र सुरु होतील. ही मोदीची गॅरेंटी आहे, पुढच्या पाच वर्षात भारताचा पहिल्या टॉप 3 अर्थव्यवस्थांमध्ये समावेश होईल.
शहरात जे लोक भाड्याच्या घरात राहतात. ज्यांच्याकडे स्वत:च घर नाही. जे अनधिकृत कॉलनीमध्ये राहतात. घर घेण्यासाठी बँकांकडून लोन मिळतं. त्याच्या व्याजात सवलत दिली जाईल. त्यासाठी लवकरच घोषणा केली जाईल.
माझ लक्ष्य गावांमध्ये 2 कोटी महिलांना
लखपतीत दीदी बनवायच आहे. एग्रीकल्चर सेक्टरच्या माध्यमातून आम्ही वुमेन सेल्फ हेल्प ग्रुपची ट्रेनिंग देऊ. यात महिलांना ड्रोन चालवण्याच प्रशिक्षण देण्यात येईल. आम्हाला गावात महिलांना मजबूत करायच आहे.
महत्त्वाचे मुद्दे
देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी यांचं मार्गदर्शन, भगत सिंह, सुखदेव, राजगुरुसारख्या वीरांच बलिदान नेहमी लक्षात ठेवलं जाईल. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, त्यांना नमन करतो. यावर्षी 26 जानेवारीला 75 वा प्रजासत्ताक दिन असेल. हा आमच्यासाठी इतिहास आहे.
मणिपूरसह देशाच्या काही भागात हिंसाचार झाला. अनेक लोकांनी आपलं जीवन गमावलं. आई-मुलीच्या सन्मानाशी खेळ झाला. आता शांततेच्या बातम्या येत आहेत. देशातील जनता मणिपूरसोबत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमिळून शांतता प्रस्थापित करेल.
भारत देशाला 1000 वर्षाची गुलामी सहन करावी लागली. 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. पुन्हा एकदा देशाला संधी मिळाली आहे. आता आपण जे करू, त्याचा परिणाम पुढच्या 1000 वर्षात दिसून येईल. भारत माता पुन्हा एकदा जागृत झाली आहे. हा कालखंड देशाला पुढे घेऊन जाईल.
त्यामुळे आपण जे स्वप्न पाहिजे जो संकल्प करायचा तो छोटा मोठा असताच कामा नये जो घाम गाळायचा जे काम करायचे ते पुढच्या 1000 वर्षांच्या देशाच्या प्रगतीच्या पायाभरणीचेच असेल, असा विश्वास मोदींनी देशवासियांमध्ये जागवला
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App