.मात्र ‘या’ अटी मान्य कराव्या लागतील.
विशेष प्रितिनिधी
नवी दिल्ली : Asaram Bapu 2013 सालच्या बलात्कार प्रकरणात आसाराम बापूंना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणास्तव त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, यादरम्यान त्यांना त्यांच्या समर्थकांना भेटू दिले जात नाही.Asaram Bapu
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, आसाराम बापू पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणार नाहीत आणि कोणत्याही समर्थकाला भेटणार नाहीत. न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती राजेश बिंदल यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.
न्यायालयाने सांगितले की, 86 वर्षीय आसाराम यांना हृदयविकारासोबतच वयोमानानुसार आरोग्याच्या समस्या होत्या. गांधीनगर न्यायालयाने 2023 मध्ये दिलेल्या जन्मठेपेच्या विरोधात आसाराम यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते.
यावर सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारकडून उत्तर मागितले होते. वैद्यकीय आधारावरच या प्रकरणाचा विचार करू, असे न्यायालयाने म्हटले होते. यापूर्वी 29 ऑगस्ट 2024 रोजी गुजरात हायकोर्टाने आसारामची याचिका फेटाळली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App