प्रतिनिधी
नवी दिल्ली : सध्या सर्वत्र महागाईचा भडका उडाला असताना जीवनावश्यक वस्तूंचे दर दिवसागणिक वाढत आहेत. दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले आहेत. 17 ऑगस्टपासून हे नवे दर लागू होणार आहेत. अशातच आता मात्र एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता गॅसच्या दरात कपात करण्यात आली आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी कपात झाली आहे. Reduction in CNG and PNG rates
मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात 6.00 रुपये प्रति किलो अशी कपात करण्यात आली आहे. तर पीएनजीच्या दरात चार रुपये प्रति किलो कपात झाली आहे. या दरात झालेल्या कपातीमुळे ग्राहकांना सीएनजी मुंबईमध्ये 80 रुपये प्रति किलो मिळणार आहे. पीएनजी 48.50 रुपयांना मिळणार आहे. तर पुण्यात सीएनजी 87 रुपये प्रतिकिलो दराने मिळणार आहे.
सीएनजीच्या दरात घट
गॅसच्या दरात मात्र कपात झाली आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात 6.00 रुपये प्रति किलो कपात झाली आहे. पीएनजी दरात 4.00 रुपये प्रति किलो कपात झाली. पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात चार रुपयांची कपात करण्यात आली आहे. 17 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App