वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील 14 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीचे नाव रेड नोटिसमधून हटवण्यात आले आहे. मेहुलने रेड नोटीस (रेड कॉर्नर नोटीस) विरुद्ध इंटरपोलच्या लियॉन मुख्यालयात अपील केल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी सीबीआयकडून सध्या कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.Red corner notice against Mehul Choksi quashed, PNB scam accused appeals to Interpol
195 देश इंटरपोलचे सदस्य आहेत. रेड नोटीस जारी केल्यावर, संबंधित व्यक्तीला तात्पुरते ताब्यात घेतले जाऊ शकते, केवळ तात्पुरते अटक केली जाऊ शकते. यानंतर त्याला अटक करण्यात आलेल्या देशाच्या कायद्यानुसार कारवाई केली जाते. बर्याच प्रकरणांमध्ये, तो ज्या देशात हवा आहे त्याच्या हवाली (प्रत्यार्पण) केले जाते.
राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप
चोकसी 2018 मध्ये देशातून पळून गेला होता. 10 महिन्यांनंतर त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. तोपर्यंत तो अँटिग्वा आणि बारब्यूडामध्ये लपून बसला होता. पुढे त्याला तेथील नागरिकत्व मिळाले. चोकसीने सीबीआयच्या अर्जाला उत्तर देताना भारतातील तुरुंगांची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचा युक्तिवाद केला होता. तिथे त्याला धोका असू शकतो. याशिवाय त्याने आरोग्याशी संबंधित युक्तिवादही केला होता.
इंटरपोलच्या पाच सदस्यीय समितीने यावर सुनावणी केली होती. त्याला कमिशन फॉर कंट्रोल फाइल्स म्हणतात. या कायदेशीर समितीला कोणत्याही व्यक्ती किंवा आरोपीविरुद्धची रेड नोटीस रद्द करण्याचा अधिकार आहे.
चोकसीने डॉमिनिका तुरुंगात काढले होते 51 दिवस
चोकसीशिवाय नीरव मोदीचेही नाव सीबीआयच्या आरोपपत्रात आहे. चोकसी मे 2021 मध्ये अँटिग्वामधून गायब झाला आणि शेजारच्या डॉमिनिकाला पोहोचला. येथे त्याला अटक करण्यात आली. त्याचे प्रत्यार्पण करण्यासाठी सीबीआयचे एक पथक डॉमिनिकाला पोहोचले, परंतु त्याआधीच त्याला ब्रिटिश राणीच्या प्रिव्ही कौन्सिलकडून दिलासा मिळाला. नंतर त्याला पुन्हा अँटिग्वाच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, 62 वर्षीय चोकसीला डॉमिनिका तुरुंगात 51 दिवस काढावे लागले.
येथे त्याने युक्तिवाद केला की त्याला अँटिग्वाला जाऊन तेथील न्यूरोलॉजिस्टकडून उपचार घ्यायचे आहेत. अँटिग्वाला पोहोचल्यानंतर काही दिवसांनी डोमिनिकाच्या कोर्टाने चोक्सीवर दाखल केलेले खटलेही रद्द केले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App