माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती; खालापूरच्या इरशाळगड गाव दरडीने गिळले; 60 जण ढिगाऱ्यात अडकले, 25 वाचविले चौघांचा मृत्यू !!


प्रतिनिधी

रायगड : रायगड जिल्ह्यात माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती घडली आहे मुसळधार पावसाने खालापूर तालुक्यातील इरशाळगड अख्खे गाव दरडीने गिळले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर आता खालापूर तालुक्यातील इरशाळगड या गावातून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. या वाडीवर दरड कोसळली आहे. मोरबे धरणाच्या बाजूला असलेल्या या वस्तीवर दरड कोसळली आहे.Recurrence of Malin tragedy; Irshalgad village of Khalapur was swallowed by the ravine; 60 people trapped in the debris, 25 saved, 4 dead

50 ते 60 घरांची ही वस्ती आहे. ही घटना बुधवारी रात्री 11.30 ते 12 वाजताच्या दरम्यान घडली. मुसळधार पाऊस पडत असताना घडलेल्या या घटनेत काही जणांचा जीव गेला असल्याचीही माहिती समोर येत आहे. तर, काही नागरिक सुखरूप वाचले आहेत. काही अद्यापही खाली अडकलेले आहेत. अनेकजण मृत्यूमुखी पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, इरशाळगड येथे ही घटना घडली आहे. इथे एकूण ४६-५० घरं आहेत . 25 लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मुख्यमंत्री सातत्याने संपर्कात असल्याचं सांगत निसर्गासामोर कोणाचं काही चालत नाही, असंही ते म्हणाले.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, या गावात मोठ्या प्रमाणा गाई म्हशीसुद्धा ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. तर, 60 पेक्षा अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. 4 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. NDRF ची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटना स्थळी पोहोचले आहेत.

 माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती

पुणे जिल्ह्यातील मंचर जवळील माळीण गाव असेच एका दरडीने गिळले होते. गावातील 74 घरांपैकी 44 घरे दरडीखाली येऊन उध्वस्त झाली होती. या दुर्घटनेत 151 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. 30 जुलै 2014 रोजी ही दुर्घटना घडली होती. खालापूर तालुक्यातील इरशाळगड मध्ये देखील या माळीण दुर्घटनेचीच पुनरावृत्ती झाली आहे.

 

Recurrence of Malin tragedy; Irshalgad village of Khalapur was swallowed by the ravine; 60 people trapped in the debris, 25 saved, 4 dead

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात