प्रतिनिधी
कोल्हापूर : नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांसाठी शिंदे – फडणवीस सरकार दिलासा देण्याच्या बेतात आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात लवकरच 50000 शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातल्या इतिहासातील ही मोठी शिक्षक भरती असेल. यापुढे महाराष्ट्रात शिक्षकांची कमतरता भासणार नाही, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.Recruitment of 50000 teachers in Maharashtra soon
केसरकर यांच्या या घोषणेमुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील शिक्षकांच्या सगळ्या बदल्या रद्द केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गणवेशाची जबाबदारी शालेय समितीवर
विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याची जबाबदारी ही स्थानिक शालेय समितीवर असणार आहे. गणवेश अगोदरच शिवले होते, आता एकसारखा गणवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे गणवेश मिळण्यास विलंब होत आहे. आधी एका गणवेशाचं वाटप करण्यात यावं, नंतर दुसरा गणवेश देण्यात यावा. गणेवशावाचून एकही विद्यार्थी राहाता कामा नये, अशा सूचनाही यावेळी केसरकर यांनी दिल्या आहेत.
यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर निशाणा साधला. संजय राऊत यांची जी पद्धत आहे, त्याच पद्धतीने आता आदित्य ठाकरे बोलत आहेत. मी अगोदरच सांगितलं होतं की आम्हाला बोलायची वेळ आणू नका. मात्र आदित्य ठाकरे बेलगाम सुटले आहेत. ठाकरे कुटुंबाप्रती आदर होता म्हणून आम्ही आमच्यावर बंधने घालून घेतली होती, असा इशारा केसरकर यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App