वृत्तसंस्था
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील सोनई परिसरात रविवारी सलग चार तास पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले. नेवासा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून सोनईत १०३ मिलीमीटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. कौतुकी नदी परिसरातील ओढे, नाल्यांना पूर आला. Record rainfall of 103 mm in Sonai of Ahmednagar district ; Flood the Kautuki river; The farmers sighed
सोनई, शिंगणापुर, पानसवाडी, हनुमानवाडी व परिसरात सुरु झालेला पाऊस रात्री अकरा वाजेपर्यंत सुरु होता. रात्री दहानंतर वीजेच्या कडकडाटासह एक तास पावसाने झोडपून काढले. गावातील सर्व रस्ते व लहान ओढ्यातून पाणी वाहत होते. पहाटे तीन नंतर गावाच्या मध्ये असलेल्या कौतुकी नदीला पूर आला. पुराचे पाणी काही दुकानात घुसल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.
सोनईनंतर एक तासाने शनिशिंगणापुर, घोडेगाव, खरवंडी, कांगोणी, गणेशवाडी,चांदा,वडाळाबहिरोबा भागात पावसाने जोर धरला. ऊस, सोयाबीन,कपाशी, पीकास या पावसाने जीवदान मिळाले आहे.जोरदार पावसाने वातावरणातील उकाडा कमी झाला असून वेळेवर झालेल्या पावसाने बळीराजा मनोमन सुखावला आहे
रविवारी ( ता.11 ) सलग चार तास पाऊस पडला. सोनई येथे १०३ मिलीमीटर विक्रमी पाऊस तर घोडेगाव-६३,चांदा-९०, वडाळाबहिरोबा-७७, नेवासा-७०, कुकाणा-४३ तर सर्वांत कमी पाऊस सलबतपुर-१५ मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती कामगार तलाठी दिलीप जायभाय यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App