सरकारी तिजोरी GST ने भरली! यंदा १८ लाख कोटींचे संकलन, आतापर्यंतचा विक्रमी आकडा

जीएसटी लागू झाल्यापासूनचा विक्रम आहे

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : २०२२-२३ हे आर्थिक वर्ष आज संपत असून उद्या १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. चालू आर्थिक वर्ष सरकारी तिजोरीने भरणारे ठरले आहे.  जीएसटी कलेक्शन जे या वर्षी सर्वाधिक आहे. गेल्या ११ महिन्यांतच या आकड्याने विक्रम केला आहे. तथापि, मार्च २०२३ ची अधिकृत आकडेवारी सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही, परंतु ती मागील महिन्याच्या आसपास असण्याची अपेक्षा आहे. या गणनेवर नजर टाकल्यास, संपूर्ण आर्थिक वर्षातील संकलन १८ लाख कोटी रुपयांच्या जवळपास आहे, जी जीएसटी लागू झाल्यापासूनचा विक्रम आहे. Record GST collection in current financial year

११ महिन्यांत आला एवढा महसूल –

१ जुलै २०१७ रोजी GST कायदा संपूर्ण भारतात एकाच वेळी लागू करण्यात आला. १८ लाख कोटी रुपयांचा आकडा या सहा वर्षांतील सर्वाधिक आहे. अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार,  आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या ११ महिन्यांत GST संकलनाने आधीच १६.४६ लाख कोटींचा आकडा पार केला आहे, जो वर्षभरात २२.७ ट्क्क्यांची मजबूत वाढ दर्शवितो.

मार्चमध्ये १.५० लाख कोटी संकलन अपेक्षित –

एका अहवालात, जीएसटी प्रकरणांशी संबंधित अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की मार्चमध्ये किमान १.५० लाख कोटी कलेक्शन दिसून येईल अशी अपेक्षा आहे. ते म्हणाले की, संकलनाचे आकडे आता येत आहेत, परंतु मार्चमध्ये सरासरी मासिक जीएसटी संकलन १.४९ लाख कोटी रुपये शिल्लक आहे, तर २०२२-२३ साठी एकूण जीएसटी महसूल १७.८८ लाख कोटी रुपये होईल, जे तब्बल १८ लाख कोटींच्या जवळ आहे. अधिका-यांनी सांगितले की, आम्हाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

Record GST collection in current financial year

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात