वृत्तसंस्था
मुंबई : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा अर्थात रेपो रेट ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय आरबीआयने घेतला असल्याची माहिती गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे. महागाई आटोक्यात येत असल्याने RBI च्या रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कर्जाचा हप्ता वाढणार नाही. RBI’s big announcement regarding repo rate; No loan installment will increase!!
आरबीआय ने आतापर्यंत सहावेळा रेपो रेट वाढवला आहे. त्यामुळे नागरिकांचे कर्जाचे EMI सुद्धा वाढत होते. आरबीआयने रेपो रेटमध्ये शेवटची वाढ ८ फेब्रुवारी २०२३ ला केली होती.
महागाई आटोक्यात येत आहे त्यामुळे रेपो रेटमध्ये सध्या बदल करणार नाही. आरबीआयचा सध्याचा रेपो रेट ६.५० टक्के आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर देशाच्या मध्यवर्ती बॅंकेसमोर अजूनही आव्हाने आहेत. पण ती आटोक्यात आणता येण्यासारखी आहेत, असे शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे.
रेपो रेट म्हणजे काय?
ज्या दराने बॅंका आरबीआय बॅंकेकडून पैसे घेतात त्या दराला रेपो दर असे म्हणतात. रेपो दर वाढणे म्हणजे आरबीआयकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे. तर रेपो रेट कमी होणे म्हणजे बॅंकेला स्वस्तात पैसे मिळणे. याचाच अर्थ आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केली तर सामान्यांच्या कर्जाचे हप्ते वाढतात. आता आरबीआयने रेपो रेट जैसे थे ठेवल्यामुळे सामान्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App