आता कारवाई झालेल्या बँकांना लाखोंचा दंड भरावा लागणार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : RBI भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी अनेक मोठ्या बँकांवर दंड ठोठावला. या यादीत आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि अॅक्सिस बँकेसह पाच बँकांची नावे आहेत. या बँकांवर नियमांचे योग्य पालन न केल्याचा आरोप आहे.RBI
आरबीआयने आयसीआयसीआय बँकेला ९७.२० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने आपल्या आदेशात म्हटले आहे की, या बँका सायबर सुरक्षा फ्रेमवर्क, केवायसी, क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील काही सूचनांचे पालन करत नाहीत, ज्यामुळे आरबीआयने बँकांवर दंड ठोठावला आहे.
या संदर्भात, बँक ऑफ बडोदावर बँकेत असलेल्या वित्तीय सेवा आणि ग्राहक सेवा काउंटरबाबत जारी केलेल्या सूचनांचे पालन न केल्याचा आरोप आहे. त्यामुळे, आरबीआयने बँक ऑफ बडोदाला ६१.४० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
किसान क्रेडिट कार्डद्वारे शेती आणि संबंधित कामांसाठी दिलेल्या अल्पकालीन कर्जांवरील व्याज अनुदानाबाबतच्या निर्देशांचे आयडीबीआय बँकेने पालन केलेले नाही. अशा परिस्थितीत, आरबीआयने आयडीबीआयला ३१.८ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
याशिवाय, बँक ऑफ महाराष्ट्रने केवायसीशी संबंधित सूचनांचे पालन केले नाही, ज्यामुळे बँकेवर ३१.८० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
तसेच अंतर्गत/कार्यालयीन खात्यांच्या अनधिकृत कामकाजाबाबत आरबीआयच्या निर्देशांचे अॅक्सिस बँकेनेही पालन केले नाही, त्यामुळे अॅक्सिस बँकेवर २९.६० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App