कर्जदारांना रिझर्व्ह बँकेचा दिलासा; रेपो दर 6.50 % वरच ‘जैसे थे’; EMI नाही बदलणार!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्जदारांना दिलासा दिला आहे. बँकेने गुरुवारी रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तो 6.50 % राहील. आरबीआयने सलग दुसऱ्यांदा दर बदललेले नाहीत. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरण बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. RBI च्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2023-24 (FY24) मध्ये महागाई दर 4 % वर राहण्याची शक्यता आहे RBI relief to borrowers; Repo rate ‘as it was’ at 6.50%; EMI will not change!!

यापूर्वी RBI ने मे 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत रेपो दर 2.50 % ने वाढवले होते. एप्रिलमध्ये झालेल्या शेवटच्या बैठकीत रेपो दर 6.50 % वर अपरिवर्तित ठेवण्यात आला होता.



रेपो दरात बदल न केल्याने कर्ज महाग होणार नाही, EMI देखील वाढणार नाही

RBI कडे रेपो रेटच्या रूपात महागाईशी लढण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे. जेव्हा महागाई खूप जास्त असते, तेव्हा RBI रेपो दर वाढवून अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह कमी करण्याचा प्रयत्न करते. रेपो दर वाढल्यास बँकांना आरबीआयकडून मिळणारे कर्ज महाग होते. त्याच्या बदल्यात, बँका त्यांच्या ग्राहकांसाठी कर्जे महाग करतात. परिणामी अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह कमी होतो आणि जर पैशाचा प्रवाह कमी झाला तर मागणी घटून महागाई कमी होते.

त्याचप्रमाणे, जेव्हा अर्थव्यवस्था वाईट टप्प्यातून जाते, तेव्हा पुनर्प्राप्तीसाठी पैशाचा प्रवाह वाढवणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आरबीआय रेपो दर कमी करते. त्यामुळे बँकांसाठी आरबीआयचे कर्ज स्वस्त होते आणि ग्राहकांनाही स्वस्त दरात कर्ज मिळते.

RBI relief to borrowers; Repo rate ‘as it was’ at 6.50%; EMI will not change!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात