Ravneet Singh Bittu जाणून घ्या आणखी काय म्हणाले? ; रवनीत सिंह बिट्टू यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे.
विशेष प्रतिनिधी
भागलपूर : Ravneet Singh Bittu रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी राहुल गांधींना देशातील नंबर वन दहशतवादी म्हटले आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी हे भारतीय नाहीत. राहुल गांधी केवळ गरीबांच्या घरी जाऊन फोटो काढत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भागलपूरमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना रवनीत सिंह बिट्टू यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, राहुल गांधी परदेशात गेल्यावर नेहमीच देशाबद्दल वाईट बोलतात. त्यांना व्यावहारिक समज नाही. आजपर्यंत त्यांना मजूर-गरिबांच्या वेदना कळत नाहीत. वयाचा निम्म्याहून अधिक वेळ निघून गेला. यामुळे त्यांची चेष्टा होते हे त्यांना समजत नाही. Ravneet Singh Bittu
Narendra Modi : WATCH : पंतप्रधानांच्या निवासस्थानी गायीने दिला वासराला जन्म; मोदींनी नाव दिले दीपज्योती
राहुल गांधींच्या अमेरिकेतील शिखांच्या वक्तव्याबाबत बिट्टू म्हणाले, ‘अलीकडे त्यांनी आपल्या वक्तव्याने शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे फुटीरतावादी शक्तींनी कौतुक केले आहे. रवनीत सिंह बिट्टू म्हणाले की, आजच्या युगात राहुल गांधी हे देशातील नंबर वन दहशतवादी आहेत, ते देशाचे नंबर वन शत्रू आहेत.
रवनीत सिंह बिट्टू यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. बिट्टी म्हणाले, आधी राहुल गांधींनी मुस्लिमांचा वापर करण्याचा प्रयत्न केला, पण तसे झाले नाही आणि आता ते शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App