प्रतिनिधी
पुणे : कसब्यात भाजपाच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडले आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी मोठा विजय मिळवला आहे. गेल्या २८ वर्षांपासून कसब्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपाला पराभवाची धूळ चारून रवींद्र धंगेकर तब्बल ११ हजार ४० मतांनी विजयी झाले आहेत. हा विजय जनता आणि महाविकास आघाडीचा असल्याची प्रतिक्रिया विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे. पण कसब्यातील पोटनिवडणुकीचा निकाला हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे. Ravindra Dhangekar won by 3 thousand 3 votes in BJP’s kasaba
भाजपच्या या बालेकिल्ल्यात 1980 च्या दशकात उल्हास काळोखे, 1991 मध्ये तात्या थोरात हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी हाताचा पंजा या काँग्रेसच्या चिन्हावर विजय मिळवला आहे. उल्हास काळोखे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. अरविंद लेले यांचा, तर तात्या थोरात यांनी गिरीश बापट यांचा पराभव केला होता. आता रवींद्र धंगेकरांनी हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.
कसब्यात धंगेकरांपुढे काँग्रेससह आघाडीतील घटक पक्ष बरोबर ठेवण्याचे आव्हान; रासने – भाजप पुढे मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान!!
कोणाला किती मते मिळाली?
रवींद्र धंगेकर यांना ७३ हजार १९४ मते मिळाली असून भाजपचे हेमंत रासने यांना ६२ हजार २४४ मते मिळाली आहेत.
मी उमेदवार म्हणून कमी पडलो : हेमंत रासने
मी उमेदवार म्हणून कमी पडलो. हा निकाल मला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केली आहे. कसब्यात मागील काही दिवसांपासून हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात काटे की टक्कर सुरू होती. ती काटे की टक्कर शेवटपर्यंत पाहायला मिळाली. मतमोजणी सुरू झाल्यापासून रवींद्र धंगेकर आघाडीवर होते आणि हेमंत रासने पिछाडीवर होते. सातव्या फेरीत फक्त हेमंत रासने आघाडीवर दिसले होते. मात्र त्यानंतरच्या सगळ्या फेऱ्यांमध्ये ते पिछाडीवर गेले.
– अपयशाचे खापर चंद्रकांतदादांवर
दरम्यान या पोटनिवडणुकीत भाजपचे ‘डिसिजन मेकर’ नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, कसब्यातील अपयशामुळे पाटील यांना नामुष्कीचा सामना करावा लागणार आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीनंतर आता कसबा मतदार संघातील पराभवाचे खापर चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App