मोडला जसप्रीत बुमराहचा महान विक्रम
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Ravi Bishnoi हैदराबादमध्ये झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात प्रथम भारतीय फलंदाजांनी खळबळ उडवून दिली आणि नंतर उरलेले काम भारतीय गोलंदाजांनी पूर्ण केले. अशा परिस्थितीत शनिवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात विक्रमांचा पाऊस पडला. यादरम्यान फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने ( Ravi Bishnoi ) जसप्रीत बुमराहला मागे टाकत मोठा विक्रम केला आहे.Ravi Bishnoi
बांगलादेशसोबत झालेल्या तिसऱ्या T20I सामन्यात अर्शदीप सिंगच्या जागी रवी बिश्नोईचा प्लेईंग-इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. बिष्णोईने या संधीचा पुरेपूर फायदा घेत शानदार गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांच्या स्पेलमध्ये 30 धावांत 3 बळी घेतले.
यासह बिश्नोईने जसप्रीत बुमराहला मागे टाकले. बिश्नोई हा भारतासाठी ५० टी-२० आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण करणारा सर्वात तरुण गोलंदाज ठरला आहे. 24 वर्षे 37 दिवस वयात 50 विकेट पूर्ण करणाऱ्या बिश्नोईने या बाबतीत अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे. भारतासाठी सर्वात कमी वयात 50 T20 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची यादी येथे पाहा –
24 वर्षे 37 दिवस – रवी बिश्नोई 24 वर्षे 196 दिवस – अर्शदीप सिंग 25 वर्षे 80 दिवस – जसप्रीत बुमराह 28 वर्षे 237 दिवस – कुलदीप यादव २८ वर्षे २९५ दिवस – हार्दिक पांड्या
बांगलादेशसोबत खेळल्या गेलेल्या तिसऱ्या T20 सामन्यात रवी बिश्नोईने केवळ जसप्रीत बुमराहचा मोठा विक्रम मोडला नाही तर युझवेंद्र चहललाही मागे टाकले. आता तो T20I क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 विकेट घेणारा भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने 33 डावात ही कामगिरी केली. या बाबतीत रवी बिश्नोईने युजवेंद्र चहलला मागे टाकले आहे, ज्याने 34 डावात 50 बळी पूर्ण केले होते. T20I मध्ये भारतासाठी सर्वात जलद 50 विकेट घेणारे गोलंदाज येथे पाहा.
२९ डाव – कुलदीप यादव ३३ डाव – अर्शदीप सिंग ३३ डाव – रवी बिश्नोई ३४ डाव – युझवेंद्र चहल
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App