रेशन घोटाळ्यात ममतांच्या तृणमूळ काँग्रेसच्या नेत्याच्या घरावर छापा घालायला गेलेल्या ED अधिकाऱ्यांवर 200 गुंडांचा हल्ला!!

वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालमधील रेशन घोटाळ्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसच्या नेत्याच्या घरावर छापा घालायला गेलेल्या सक्तवसुली संचालनालय अर्थात ED अधिकाऱ्यांवर काँग्रेसच्या नेत्याच्या 200 गुंडांनी हल्ला केला. त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. छापे घालण्याच्या कायदेशीर कारवाईत त्यांना अडथळे आणले.  24 परगणा जिल्ह्यातील संदेशखळी या गावात ही घटना घडली.  Ration scams in West Bengal

रेशन घोटाळ्यातला आरोपी शहानवाज शेख हा ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसचा स्थानिक नेता आहे. त्याने राईस मिलचा धंदा सुरू केला. त्या पाठोपाठ त्याने 3 शेल कंपन्या स्थापन करून त्यातून पैशाची अफरातफर केली. याच प्रकरणात त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर छापे घालण्यासाठी ED च्या अधिकाऱ्यांची टीम संदेशखळी या गावात पोहोचली होती. मात्र तेथे शहानवाज शेख याच्या 200 गुंडांनी लाख्या काठा तलवारींसह ED च्या अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर हल्ला केला. त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली.

रेशन घोटाळ्यात यापूर्वी ED ने पश्चिम बंगालच्या विद्यमान वनमंत्री आणि आधीच्या अन्नमंत्री ज्योतीप्रिया मलिक यांच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर छापे घालून या घोटाळ्यातली महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. त्याआधारे त्यांनी पुढची कारवाई सुरू केली. यात राईस मिल मालक बाकीबूर रहमान याला अटक देखील केली होती. त्याने देखील वेगवेगळ्या शेल कंपन्यांच्या आधारे पैशाच्या अपरातफर केली होती. याची पुढची कडी म्हणजे शहानवाज शेख होता. त्याच्या ठिकाणांवर छापे घालायला गेलेल्या ED च्या अधिकाऱ्यांवर त्याच्या 200 गुंडांनी हल्ला केला आणि त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. पश्चिम बंगाल सरकारने या संदर्भात अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

Ration scams in West Bengal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात