रतन टाटा यांनी ‘या’ बाबतीत आनंद महिंद्रांना मागे टाकत केला नवा विक्रम

रतन टाटांच्या या विक्रमाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली  : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी नवा विक्रम केला आहे. रतन टाटांच्या या विक्रमाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. सोशल मीडियावर रतन टाटा यांनी आनंद महिंद्रा यांना मागे टाकले आहे. Ratan Tata beat Anand Mahindra in social media followers and set a new record

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर त्यांच्या स्पष्ट मतांसाठी ओळखले जातात. देशातील ज्वलंत प्रश्नांवर ते लगेचच आपले मत मांडतात. आनंद महिंद्रां यांचे X वर 10.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. म्हणजेच आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय उद्योगपती आहेत, मात्र ताज्या आकडेवारीनुसार रतन टाटा यांनी आनंद महिंद्रा यांना मागे टाकले आहे. त्यांचे आता 12.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 नुसार, रतन टाटा यांचे भारतातील व्यावसायिक जगात सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.

रतन टाटा यांचे सध्या 12.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि एका वर्षात त्यांचे फॉलोअर्स 8 लाखांनी वाढले आहेत. रतन टाटा X वर फारसे सक्रिय नाहीत, तरीही त्यांची कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते.

360 वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 नुसार, भारतीय सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केलेले उद्योगपती 84 वर्षीय रतन टाटा आहेत. आनंद महिंद्रा यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.महिंद्राचे 10.8 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. हुरुन इंडिया आणि 360 वन वेल्थ यांनी संयुक्तपणे 360 वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 प्रकाशित केली आहे.

Ratan Tata beat Anand Mahindra in social media followers and set a new record

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub