विशेष प्रतिनिधी
सिडनी : स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने अंतिम सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदवेदवला हरवत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद जिंकले. मेदवेदेवची झुंज मोडून काढत २-६, ६-७, ६-४, ६-४, ७-५ असा पराभव केला. नदालच्या खात्यात आता सर्वाधिक २१ ग्रँडस्लॅम जेतेपदे झाली आहेत. असा विक्रम करणारा तो जगातील पहिला टेनिसपटू ठरला. Raphael won 21 Grand Slam titles, winning the Australian Open for the second time; Daniel Medvedev lost
अंतिम सामन्यात रशियाच्या मेदवेदेवने पहिल्या सेटमध्ये नदालचा ६-२ अशा फरकाने पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासून नदालकडे मेदवेदेवच्या सर्व्हिसचे उत्तर नव्हते.मेदवेदेवला दुसरा सेट जिंकण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. या सेटमध्ये नदालने चांगली सुरुवात केली होती आणि तो मेदवेदेवच्या पुढे होता. मात्र, नंतर रशियन खेळाडूने शानदार पुनरागमन केले आणि ६-६ अशी बरोबरी साधली. यानंतर अखेरच्या मिनिटात त्याने शानदार खेळ करत दुसरा सेट ७-६ असा जिंकला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App