रणवीर आणि समय यांचे हे व्हिडिओ लोकांना खूपच आक्षेपार्ह वाटले आहेत
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे रणवीर अल्लाहबादिया, समय रैना आणि युट्यूब शो इंडियाज गॉट लेटेंट. या शोचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये रणवीर अल्लाहबादिया आणि समय रैना अश्लील कमेंट करताना दिसत आहेत.
रणवीर आणि समय यांचे हे व्हिडिओ लोकांना खूपच आक्षेपार्ह वाटले आहेत आणि दोघांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि कठोर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.
आता रणवीर अल्लाहबादियाच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. कारण त्यांच्या अश्लील वक्तव्याचा मुद्दा संसदेत उपस्थित केला जाणार आहे. राजकीय पक्ष युट्यूबरवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.
शिवसेना (ठाकरे गट) खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, त्या आयटी आणि कम्युनिकेशन स्थायी समितीसमोर हा मुद्दा उपस्थित करतील. त्या म्हणाल्या की, इंडियाज गॉट लेटेंट अश्लील, निंदनीय कंटेंट विनोदी म्हणून सादर करते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App