Rameshwaram cafe blast: आरोपीवर 10 लाखांचा इनाम जाहीर, NIA ने प्रसिद्ध केले छायाचित्र

Rameshwaram cafe blast Rs 10 lakh reward announced for accused NIA arrests famous banana photograph

माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे. Rameshwaram cafe blast Rs 10 lakh reward announced for accused NIA arrests famous banana photograph

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) बुधवारी बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफेमध्ये आयईडी बॉम्ब पेरणाऱ्या व्यक्तीवर 10 लाख रुपयांचा इनाम जाहीर केले. जो कोणी या स्फोटातील आरोपींची माहिती देईल त्याला सरकारकडून 10 लाख रुपये दिले जातील. 1 मार्च रोजी झालेल्या स्फोटात कॅफेमध्ये उपस्थित किमान 10 जण जखमी झाले होते, हे उल्लेखनीय. यासंबंधीची माहिती सार्वजनिक करत एनआयएने ‘वॉन्टेड’ पोस्टरमधील आरोपीचे रेखाचित्र प्रसिद्ध केले असून माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे.

केंद्रीय गुन्हे शाखा आणि एनआयए या दोन्हीकडून शोध सुरू असताना या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, हे विशेष. कर्नाटक सरकारने केंद्रीय एजन्सीकडे तपास न सोपवल्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने तपास हाती घेण्याचे निर्देश दिल्यानंतर एनआयएने मंगळवारी तपास सुरू केला.

कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी बुधवारी सांगितले की स्थानिक पोलिसांना महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत आणि ते या प्रकरणाची उकल करण्याच्या जवळ येत आहेत. स्फोटानंतर शहरात खळबळ उडाली होती, कॅफे बंद करण्यात आले होते, मात्र 8 मार्च रोजी कॅफे पुन्हा सुरू होणार आहे.

1 मार्च रोजी कॅफेमध्ये जेवणाच्या वेळी गर्दी होती, तेव्हा एक स्फोट झाला होता ज्यामध्ये 10 लोक जखमी झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की एक व्यक्ती जो एक तास आधी कॅफेमध्ये आला होता आणि कॅफेमध्ये काही मिनिटेच थांबला होता, त्याने एक बॅग मागे सोडली होती ज्यामध्ये टाइमर असलेली आयईडी होती. त्या माणसाने रवा इडलीची प्लेट ऑर्डर केली पण खाल्ली नाही.

या फुटेजच्या आधारे संशयित आरोपीचा फोटो व्हायरल झाला. NIA च्या ‘वॉन्टेड’ नोटीसने बुधवारी पुष्टी केली की व्हायरल फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती संशयित मानली जात आहे. छायाचित्रानुसार, संशयित हा सडपातळ बांधा असलेला उंच माणूस असून त्याचे वय 30 ते 40 वर्षांच्या दरम्यान असू शकते. कॅफेच्या आतील सीसीटीव्हीवरून मिळालेल्या याआधीच्या छायाचित्रांमध्ये तो मास्क घातलेला दिसत होता, परंतु बुधवारी एनआयएने जारी केलेल्या छायाचित्रात त्याचा चेहरा दिसत आहे.

Rameshwaram cafe blast Rs 10 lakh reward announced for accused NIA arrests famous banana photograph

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात