अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा, नववर्षात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत राम महोत्सव; सर्वात मोठा सोहळा


प्रतिनिधी

अयोध्या : श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीसह रामलल्लाच्या अभिषेकाची तयारी सुरू झाली आहे. याबाबत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या मंदिर बांधकाम समितीची रविवारी बैठक झाली. त्यात 14 ते 26 जानेवारीदरम्यान शुभ मुहूर्तावरील हा विधी अभूतपूर्व आणि अविस्मरणीय करण्यावर चर्चा करण्यात आली.Rama Lalla’s Pranapratistha in Ayodhya, Ram Mahotsav from North to South in the New Year; The biggest celebration

पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ते २५ जानेवारीस प्राणप्रतिष्ठा करतील. लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारा हा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनानंतरचा सर्वात मोठा उपक्रम ठरेल. नववर्ष प्रारंभापासून राम लहर देशभरात उत्तर ते दक्षिण आणि पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत असेल.बैठकीत रूपरेषा, भाविकांच्या सुविधांवर चर्चा झाली. सोहळ्यास आध्यात्मिक केंद्रांचे प्रतिनिधी, प्रमुख मठ, आश्रम, तीर्थक्षेत्र यांचे प्रतिनिधी, नामवंत व्यक्ती, शहिदांचे नातेवाईक येतील. बौद्ध, जैन, शीख पंथांच्या देवस्थानांना निमंत्रण असेल. सर्व मंदिरांमध्ये हनुमान चालिसा, रामचरित मानस पठण होईल. दिवाळीसारखे प्रत्येक घरासमोर किमान पाच दिवे लावले जातील. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास म्हणाले, हा प्रसंग दुसऱ्या स्वातंत्र्य दिनासारखा आहे. ५०० वर्षांनंतर देव त्याच्या स्थापित हाेतील. ५० हजार भाविकांसाठी ३२ हजार कोटींची विकासकामे सुरू आहेत.

अयोध्येत निर्विघ्न आयोजनासाठी आतापासून पूजा सुरू होत आहेत

प्राणप्रतिष्ठा सोहळा निर्विघ्न होण्यासाठी ट्रस्टने महापूजेला सुरुवात केली आहे. कर्नाटकातील पुरोहित चार वेद स्वाहाकार यज्ञ, श्रीमद भागवत पठण यज्ञ करत आहेत. महाराष्ट्रातील पुरोहित यज्ञ करत आहेत. अयोध्येतील स्थानिक ब्राह्मणही पूजा करत आहेत. इतर राज्यातील पुजारीही पूजेसाठी अयोध्येत येत आहेत.

रामलल्लाची भव्य मूर्ती ऑक्टोबरपर्यंत तयार होईल

श्री रामलल्लाची मूर्ती कर्नाटकातील दोन, राजस्थानमधील एका प्रकारच्या संगमरवरापासून बनवली जात आहे. गणेश एल भट्ट, कर्नाटकातील योगिराज आणि राजस्थानचे सत्यनारायण पांडे श्री रामलल्लाची बालरूपी मूर्ती बनवत आहेत. त्यांचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल.

Rama Lalla’s Pranapratistha in Ayodhya, Ram Mahotsav from North to South in the New Year; The biggest celebration

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात